हॉकर्सकडून दररोज 20 रुपये वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 12:55 AM2017-01-09T00:55:41+5:302017-01-09T00:55:41+5:30

बळीराम पेठ, सुभाष चौक तसेच टॉवर ते घाणेकर चौक परिसरातील विक्रेत्यांकडून दररोज दहा रूपयाच्या ऐवजी 20 रूपये वसुली केली जात असून मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होनाजी चव्हाण यांनी केला़

Recovery of Hawkers 20 Rupees Daily | हॉकर्सकडून दररोज 20 रुपये वसुली

हॉकर्सकडून दररोज 20 रुपये वसुली

Next

जळगाव : शहरात काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येऊन वाहतुकीला अडसर ठरणा:या विक्रेत्यांना उठवित स्थलांतराचा पर्याय देण्यात आला़ यादरम्यान बळीराम पेठ, सुभाष चौक तसेच टॉवर ते घाणेकर चौक परिसरातील विक्रेत्यांकडून दररोज दहा रूपयाच्या ऐवजी 20 रूपये वसुली केली जात असून मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होनाजी चव्हाण यांनी केला़ तर दुसरीकडे आयुक्तांनी संबंधित प्रकाराबाबत नेमकी तक्रार काय ती आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली आह़े
बळीरामपेठ, सुभाष चौक तसेच टॉवर चौक ते घाणेकर चौक या दरम्यान विक्रेत्यांकडून दररोज दहा रूपयांची पावती वसुली केली जात होती़ मात्र 2 जानेवारी पासून या विक्रेत्यांकडून महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचा:यांकडून दहा रूपयांच्या दोन लाल रंगाच्या विना नावाच्या पावत्या देवून 20 रूपयांची वसुली केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे, अशी माहिती होनाजी चव्हाण यांनी दिली़
20 रूपये वसुलीबाबत काही ठराव, किंवा फेरीवाला समितीचे नवीन धोरण असेल, त्याबाबत माहिती द्यावी? जर हॉकर्सच्या जागेनुसार पैशांची वसुली असेल तर रस्त्यावर किंवा घरासमोर रस्त्याला अडथळा ठरणा:या चारचाकी मालकांकडून पैसे वसूल केले जावेत, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला़  योग्य निर्णय न झाल्यास गळचेपी धोरणाविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरू असा, इशारा चव्हाण यांनी दिला आह़े

 नोंदणीकृत हॉकर्सकडून दर महिन्याला तीनशे रूपयांची वसुली केली जात़े त्यानुसार पावती दिली जात़े नोंदणीकृत नसणा:या विक्रेत्याकडून दररोज दहा रूपये व जागा जास्त असल्यास वीस रूपये वसूल केले जातात़ पावतीवर नाव टाकण्याचे कायदेशीर बंधन नाही़ पावतीमुळे वसूल झालेला पैसा हा मनपा फंडातच जमा होतो़ होनाजी चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठविला आह़े त्यामुळे नेमकी त्यांची तक्रार काय ते समजून येत नाही? तक्रारीसाठी महानगरपालिका आह़े काही गैरप्रकार असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल़
- जीवन सोनवणे, आयुक्त,

Web Title: Recovery of Hawkers 20 Rupees Daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.