वर्षभरात 23 लाख रुपयांचा दंड वसूल
By admin | Published: March 6, 2017 12:48 AM2017-03-06T00:48:46+5:302017-03-06T00:48:46+5:30
अवैध गौण खनिज वाहतूक : गेल्या दोन महिन्यात कारवाई जोरदार
पाचोरा : तालुक्यात अवैध वाळू उपशावर कडक कारवाई होत असून जवळपास वर्षभरात आज अखेर्पयत 23 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. यामुळे चोरटी वाहतूक करणा:यांमध्ये धडकी भरली आहे.
गेल्या दोन महिन्यात कारवाई वेगात सुरू असून सध्या पाचोरा तहसील आवरात वाहने उभी करायला जागा नसून 20 ट्रॅक्टर, 2 डंपर जप्त केले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून जप्त वाहनांची सुटका न झाल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
महसूल विभागावर जि.प-पं.स. निवडणुकीचा ताण असतानाही तालुक्यातील अधिका:यांनी वचक निर्माण केल्याचे दिसत आहे. तहसीलदार व प्रांताधिकारी आता आयएएस वर्गातील असल्याने कठोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे महसुलात वाढ झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील वाळूचे ठेके लिलावाअभावी बंद आहे. यामुळे चोरटय़ा वाहतुकीशिवाय वाळू मिळत नाही तेव्हा शासनाने वाळू व गौण खनिजाची दैनंदिन रॉयल्टी रोख भरणा स्वीकारुन तहसीलदार यांचेकडील परवाना देऊन सुरु करावी व महसूल गोळा करावा, अशी मागणी आहे. तर 2 हजार रुपये प्रतिब्रास रॉयल्टीचा दर ठेवला तरीही एका वाहनाला 6 ब्रासची दैनंदिन परवाना दिल्यास मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळेल व चोरी होणार नाही, असे बोलले जात आहे.
फेब्रुवारीत 82 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यात गिरणा, तितूर, अग्नावती नद्या वाहतात. पैकी गिरणा नदीची वाळू उत्कृष्ट असल्याने परजिल्हय़ात वाढती मागणी असल्याने 8 ब्रासचे डंपर जेसीबीने ताबडतोब भरले जाते तर ट्रॅक्टरदेखील भरून चोरीने वाळू वाहतूक होते. मात्र महसूल कर्मचा:यांनी मोठी कारवाई करीत तहसील आवारात सर्व जप्त वाहनांचाच गराडा असल्याने तहसीलदारांचीच गाडी लावण्यास जागा नाही.