मनपाकडून २१ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:27+5:302021-08-14T04:21:27+5:30
जळगाव : मनपाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, शुक्रवारी मनपाकडून फुले मार्केटमध्ये २१ लाखांची ...
जळगाव : मनपाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, शुक्रवारी मनपाकडून फुले मार्केटमध्ये २१ लाखांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, मनपाकडून पुढील आठवड्यात मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांची नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी गाळेधारकांची सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
स्वप्निल सोनवणे यांची निवड
जळगाव : राज्यातील संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या खान्देश विभागीय संघटकपदी तालुक्यातील नंदगाव येथील स्वप्निल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेतर्फे सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत पदोन्नती देण्यात आली. यावेळी सोनवणे यांची खान्देश विभागीय संघटकपदी पदोन्नती झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम व प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे यांनी सर्वानुमते ही निवड केली.
रस्ते दुरुस्तीचे काम थांबले
जळगाव : शहरातील रस्त्यांची परिस्थिती भीषण असल्याने मनपाकडून ९ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपुरती दुरुस्ती करून पुन्हा हे काम थांबले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवरचे खड्डे कायम असून, रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पावसानंतर पुन्हा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.