१२८ पोलीस शिपाईपदांसाठी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:37+5:302021-08-14T04:20:37+5:30

जळगाव : पोलीस शिपाई भरतीच्या जाहिरातीतील शासनाने मराठा समाजासाठी निर्माण केलेल्या एसईबीसी प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवल्या होत्या. परंतु, ...

Recruitment for 128 police posts | १२८ पोलीस शिपाईपदांसाठी भरती

१२८ पोलीस शिपाईपदांसाठी भरती

Next

जळगाव : पोलीस शिपाई भरतीच्या जाहिरातीतील शासनाने मराठा समाजासाठी निर्माण केलेल्या एसईबीसी प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवल्या होत्या. परंतु, न्यायालयाने मराठा/एसईबीसी आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे एसईबीसी प्रवर्गात आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून २२ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्जातील प्रवर्ग बदल करता येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १२८ पोलीस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तर, ऑनलाइन अर्जात एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडण्यासाठी आणि सर्व उमेदवारांना पासवर्ड बदल करून घेण्यासाठी १५ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून २२ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना प्रवर्ग बदल, पासवर्ड बदल तसेच ई-मेल आयडी अपडेट करून घ्यावयाचा आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.

उमेदवारांसाठी मदत कक्ष

भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या निर्देशानुसार ओएमआर व्हेंडर न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. मुंबई यांची निवड करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उमेदवारांसाठी स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षात मानव संसाधन पोलीस निरीक्षक यांच्याकडे समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस भरतीसंदर्भात उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी मदत कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

...तर लागलीच तक्रार करा

पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शीपणे राबविण्यात येत आहे. त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही़ तसेच एजंट, बाहेरच्या दलाल लोकांकडून उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा व पोलीस अधीक्षक कार्यालयालाही कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे़

Web Title: Recruitment for 128 police posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.