जीएमसीत ६५ रिक्तपदांवर भरती प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:25+5:302021-07-04T04:12:25+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांच्या ६५ रिक्तपदांसाठी ...

Recruitment process for 65 vacancies in GM | जीएमसीत ६५ रिक्तपदांवर भरती प्रक्रिया

जीएमसीत ६५ रिक्तपदांवर भरती प्रक्रिया

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांच्या ६५ रिक्तपदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून १२० दिवसांच्या कालावधीकरिता कंत्राटी तत्त्वासाठी या भरती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.

दैनंदिन रुग्णसेवेच्या दृष्टीने महाविद्यालय व रुग्णालय आस्थापनेवरील अचिकित्सालयीन व चिकित्सालयीन विषयातील सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची माहिती अधिष्ठाता कार्यालयात सूचनाफलकावर लावण्यात आली आहे. ७ जुलै अर्ज मागविण्याची अंतिम तारीख असून मुलाखत ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

अशी आहेत रिक्त पदे

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या १७ विषयांच्या ३१, वरिष्ठ निवासी पदाच्या ११ विषयांच्या २५ तर ९ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत.

Web Title: Recruitment process for 65 vacancies in GM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.