परीक्षा शुल्कात ५० टक्के कपात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:18+5:302021-05-19T04:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे शुल्कात पन्नास टक्के कपात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे शुल्कात पन्नास टक्के कपात करावी किंवा सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव रोहित काळे आणि जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्व विद्यापीठांनी सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन परीक्षा आणि ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला येणारा खर्च यात खूप तफावत आहे. गेल्या वर्षभरापासून ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वच विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि अर्थसाहाय्याचा दिलासा म्हणून होऊ घातलेल्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे किंवा त्यात ५० टक्के कपात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.