भुसावळला ‘कोरोना’ संसर्गाची शक्यता कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 09:58 PM2020-03-05T21:58:01+5:302020-03-05T21:58:07+5:30
खबरदारी घेण्याचे मात्र आवाहन : नेहमीचे व्यवहार सुरळीत ; शाळांमध्येही चांगली उपस्थिती
भुसावळ : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असला तरी भुसावळ शहर परिसर हॉट असल्यामुळे येथे कोरोनाची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. दरम्यान शहरात याबाबत कोणतीही भीती नसून शाळांमध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली दिसून आली. तर या व्हायरसची भीती नसली तरी सावधानता बाळगण्याचे आवाहनही केले जात आहे.
या रोगापासून बचाव करण्यासाठी कमीत कमी वेळोवेळी २० सेकंद साबण आणि पाण्याने नियमित हात धुवावे. एक चांगला सँनीटायझरदेखील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकते, असे केल्याने हातावरील जिवंत विषाणू पासून मुक्तता होते. ज्यास खोकला किंवा सर्दी आहे, अशा व्यक्तीकडून लांब राहणे गरजेचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खोकलतो किंवा शिंकतो तेव्हा विषाणू हवेत पसरतो. आपण अधिक जवळ राहिल्यास श्वसाद्वारे हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच आपण वारंवार आपल्या नाक, तोंड आणि डोळ्यांना स्पर्श करत असतो, ते टाळावे. दूषित हवेपासून विषाणू नाकातून किंवा डोळ्यातून शरीरात जाऊ शकतो त्यामुळे सभोवतालच्या परिसरात काळजी घ्या, असे सुचविण्यात आले आहे. दरम्यान या व्हायरस बद्दल बरीच चर्चाअसून शहरात संसर्गाची भीती थोडी असली तरी दैनंदिन व्यवहार अगदी सुरळीत आहेत.
भुसावळ शहर हॉट असल्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे. नियमित हात धुवा, खोकलताना ,शिकताना रुमालाचा वापर करा गर्दीमध्ये जाण्याचे टाळा. मुलांना सर्दी-पडसे असल्यास शाळेत पाठवू नका. -डॉ. हेमंत अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ, भुसावळ.
कोरोना व्हायरस असलेल्या व्यक्तीकडून खोकला किंवा शिंक यामार्फत निरोगी व्यक्तीच्या डोळे व नाका-तोंडात जंतू जाऊ शकतात. अशा व्यक्तीपासून दोन ते पाच मीटर अंतर ठेवा. आजारी व्यक्तीला मास्क वापरण्याचे सांगावे, बाहेरून आल्यावर साबण व पाण्याने २० सेकंद पर्यंत हात धुवावे. -डॉ.सुमीत महाजन, बालरोगतज्ज्ञ , भुसावळ.
शाळेमध्ये २ हजार ९०० विद्यार्थी शिक्षण घेतात. कोरोना विषाणू संदर्भात कुठलाही भीती नाही. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर याचा काहीही परिणाम नाही. मुलांना शिकंताना रुमाल सोबत ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. - नितीन किरंगे, मुख्याध्यापक, के. नारखेडे विद्यालय,भुसावळ