प्रियकरासोबत पलायन केलेल्या विवाहितेचा पतीसोबत जाण्यास नकार

By admin | Published: May 27, 2017 04:07 PM2017-05-27T16:07:59+5:302017-05-27T16:07:59+5:30

दोन्ही मुलांसह प्रेयसीचा केला प्रियकराने स्विकार

Refusal to accompany a husband married with a lover | प्रियकरासोबत पलायन केलेल्या विवाहितेचा पतीसोबत जाण्यास नकार

प्रियकरासोबत पलायन केलेल्या विवाहितेचा पतीसोबत जाण्यास नकार

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.27- दोन मुलांसह प्रियकरासोबत पलायन केलेली विवाहिता  शनिवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाली, मात्र पती व सासुने विनंती करुनही तिने पुन्हा घरी येण्यास नकार दिला. प्रियकरासोबतच राहण्यावर ठाम असल्याने पती व सासूला माघारी फिरावे लागले. प्रियकरानेही तिचा दोन्ही मुलांसह स्विकार केला.
यावल येथील दोन मुलांची आई व तेथीलच अविवाहित तरुण पंधरा दिवसापूर्वी यावल येथून जळगावला आले होते व बसस्थानकातून दोघंही रफूचक्कर झाले होते. याप्रकरणी विवाहितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. नंतर ही तक्रार शून्य क्रमांकाने यावल पोलीस स्टेशनला वर्ग झाली होती. 

Web Title: Refusal to accompany a husband married with a lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.