ग्राहक मंचाने आदेश देऊनही शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 AM2021-02-25T04:18:43+5:302021-02-25T04:18:43+5:30
येतील ॲड. संतोष चोपडा यांच्या शालकाचा मुलगा शुभ सचिन संघवी हा शिरसोली रस्त्यावरील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिक्षण ...
येतील ॲड. संतोष चोपडा यांच्या शालकाचा मुलगा शुभ सचिन संघवी हा शिरसोली रस्त्यावरील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. यंदा त्याला सहावीसाठी बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील शाळेत दाखल करावयचे असल्याने ॲड. चोपडा यांनी मुख्याध्यापकांकडे शाळा सोडण्याचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केला. यावेळी त्यांना पूर्ण शिक्षण शुल्क भरल्याशिवाय दाखल मिळणार नाही असे सांगण्यात आले. कोरोनामुळे शाळाच बंद होत्या, तर शिक्षण शुल्क भरण्याचा विषयच नाही, असे ॲड. चोपडा यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ग्राहक मंच, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान, न्यायालयाने १ जून २०२० ते ३० जुलै २०२० या कालावधीतील शुल्क अंडर प्रोटेस्ट शुल्क तक्रारदाराने भरावे व शाळेनेही त्यांना दाखला द्यावा असे आदेश ग्राहक मंचाच्या अध्यक्षा वि.वि. वाणी, सदस्या पूनम मलिक व सदस्य सु.मो.जाधव यांच्या पीठाने दिले. या आदेशानंतरही दाखला मिळत नसल्याचे ॲड.चोपडा यांचे म्हणणे आहे.