जळगावात महिला आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह उचलण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:44 PM2018-06-02T22:44:07+5:302018-06-02T22:44:07+5:30

मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन महिला आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा शिरसोली येथील वंदना रवींद्र महाजन (वय ४०) यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी गोंधळ घातला.

Refuse to raise bodies without the arrest of women accused in Jalgaon | जळगावात महिला आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह उचलण्यास नकार

जळगावात महिला आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह उचलण्यास नकार

Next
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळशिरसोली येथील जळीत महिलेची १८ दिवस मृत्यूशी झुंजतणाव झाल्याने मागविला अतिरिक्त बंदोबस्त

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२ - मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन महिला आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा शिरसोली येथील वंदना रवींद्र महाजन (वय ४०) यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी गोंधळ घातला. वातावरण चिघळल्याने पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता. दरम्यान, पोलीस व काही प्रतिष्ठीत नागरिकांनी समजूत घातल्यानंतर सायंकाळी वंदना यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
चारित्र्यावर संशय घेऊन वंदना रवींद्र महाजन (वय ४०) या महिलेला घराशेजारी राहणाऱ्या दोघांनी रॉकेल टाकून पेटविल्याची घटना १६ मे रोजी पहाटे दोन वाजता शिरसोली प्र.न. (ता.जळगाव) येथे घडली होती. ७५ टक्के जळालेल्या वंदना यांनी १८ दिवस मृत्यूशी झुंज दिली. शनिवारी दुपारी बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
खुनाचे कलम वाढविले
या घटनेप्रकरणी सात जणांविरुध्द जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. बापू सिताराम महाजन, सुभाष रामभाऊ महाजन,जितेंद्र महाजन व नवल बारी या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे, ते सध्या कारागृहात आहेत. वंदना यांच्या मृत्यूनंतर आता खूनाचे कलम वाढविण्यात आले आहे. या गुन्ह्यात आरोपींमध्ये नाव असलेल्या वर्षा अंबादास महाजन, रेखा संतोष महाजन व रुपाली गोविंद माळी या तिन्ही महिलांना अद्याप अटक झालेली नाही, त्यांना अटक करावी म्हणून वंदना यांचा मुलगा हरीष, मुलगी शोभा महेश महाजन, जावई महेश महाजन (रा.यावल) यांनी पोलिसांकडे मागणी केली. तिन्ही महिलांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

Web Title: Refuse to raise bodies without the arrest of women accused in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.