पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथींंकडून रेल्वे प्रवाशाला ट्युबलाईटने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:31 PM2018-03-27T13:31:20+5:302018-03-27T13:31:20+5:30

भुसावळ ते भादली दरम्यान महानगरी एक्सप्रेसमधील घटना

Refusing to pay money, the third person rushed to the railway conductor tubelite | पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथींंकडून रेल्वे प्रवाशाला ट्युबलाईटने मारहाण

पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथींंकडून रेल्वे प्रवाशाला ट्युबलाईटने मारहाण

Next
ठळक मुद्देदोघांना घेतले आरपीएफने ताब्यातपोलिसांनी केली धरपकड

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - पैसे देण्यास नकार दिल्याने महाजन मुलचंद प्रजापती (वय २५, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) या रेल्वे प्रवाशाला तृतीयपंथींनी ट्युबलाईटने मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी महानगरी एक्सप्रेसमध्ये भुसावळ ते भादली दरम्यान घडली. या प्रकरणी रेश्मी गुरु ज्योती (वय २०) व शिल्पा गुरु ज्याती (वय ४०) दोन्ही रा.समतानगर, भुसावळ या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसच्या इंजिनपासून दुसºया क्रमांकाच्या जनरल बोगीतून महाजन प्रजापती हा तरुण प्रवास करीत होता. या बोगीत भुसावळ येथून काही तृतीयपंथी बसले. गाडीने भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर त्यांनी प्रवाशांकडे पैसे मागायला सुरुवात केली. भादली स्टेशन येण्याच्या अगोदर रेश्मी व शिल्पा या दोघांनी प्रजापत याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने नकार दिला. त्यावरुन दोघांनी प्रजापतशी वाद घातला. या वादात रेल्वेच्या बोगीत लावलेली ट्युबलाईट काढून या दोघांनी प्रजापतला मारहाण करायला सुरुवात केली. त्यात पायावर ट्युबलाईट फोडल्यामुळे प्रजापत रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला.
पोलिसांनी केली धरपकड
जनरल बोगीत हाणामारी झाल्याचे समजताच रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी या बोगीत धाव घेतली. संजय निकम या लोहमार्ग कर्मचाºयाने जखमी प्रजापत याला जळगाव स्थानकावर उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या पायावर चार टाके घालण्यात आले. दरम्यान, या निकम यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर जळगाव येथे स्टेशन डायरीला नोंद घेण्यात आली.
दोन्ही तृतीयपंथींची वैद्यकिय तपासणी
या गाडीत असतानाच रेल्वे सुरक्षा बलाने रेश्मी ज्योती व शिल्पा ज्योती या दोघांना ताब्यात घेतले. या झटापटीत त्यांनाही किरकोळ खरचटल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार व वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर भुसावळ येथे नेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. उपचारानंतर प्रवाशी प्रजापत मुंबईकडे रवाना झाला.

Web Title: Refusing to pay money, the third person rushed to the railway conductor tubelite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.