तांदुळवाडी येथे क्षेत्रीय किसान गप्पागोष्टी शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 PM2020-11-29T16:05:39+5:302020-11-29T16:06:01+5:30
तांदुळवाडी येथे क्षेत्रीय किसान गप्पागोष्टी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
Next
क जगाव, ता.भडगाव : येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना अंतर्गत क्षेत्रीय किसान गप्पागोष्टी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद येथील शास्त्रज्ञ किरण मांडवडे यांनी शेती पूरक व्यवसाय काळाची गरज या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय चारा पीक नियोजन व कुक्कुटपालन याविषयी मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी बीबीएफ यंत्र व यांत्रिकीकरण यांत्रिक शेतीविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी एन. व्ही. नाईनवाढ यांनी कोरडवाहू शाश्वत शेती योजनेविषयी मार्गदर्शन करून लाभार्थीचे कांदा चाळ व मुरघास युनिट या बाबींचे सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. तसेच आत्मा योजना अंतर्गत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी यांना बरसीम चारा पीक बियाण्याचे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेविषयी र मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी डॉ.रवींद्र निकम अध्यक्षस्थानी होते. सूत्रसंचालन भूषण वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भागवत पाटील, कृषी सहायक सचिन पाटील व सुखदेव गिरी यांनी सहकार्य केले.