रावेर येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर हस्तलिखित पेऱ्यावर नोंदणी करण्यास ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 04:57 PM2018-11-11T16:57:58+5:302018-11-11T16:59:05+5:30
शेतकरी बांधवांच्या घरात मळणी करून ज्वारीचे उत्पादन घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर मात्र आॅनलाइन ज्वारी पिकाच्या पेºयाची नोंदणी झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांची ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या यंत्रणेने ठेंगा दाखवला असल्याने शेतकरीवर्ग वाºयावर सुटला आहे.
रावेर, जि.जळगाव : शेतकरी बांधवांच्या घरात मळणी करून ज्वारीचे उत्पादन घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर मात्र आॅनलाइन ज्वारी पिकाच्या पेºयाची नोंदणी झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांची ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या यंत्रणेने ठेंगा दाखवला असल्याने शेतकरीवर्ग वाºयावर सुटला आहे. एकीकडे शेतकºयांना दुष्काळाच्या झळा बसत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे शेतकºयांना लढा द्यावा लागत असल्याची बाब शोचनीय असल्याची शोकांतिका व्यक्त होत आहे.
शासनातर्फे आधारभूत किमतीवर ज्वारी व मका खरेदी केंद्र्र सुरू करण्यासाठी शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकºयांना चालू ज्वारी वा मका पीकाचा आॅनलाइन पेरा लावलेला संगणकीय सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकची सत्यप्रत असे दस्तऐवज आवश्यक असल्याचे सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, तालुक्यातील खानापूरसह अन्य काही महसूल सजांमधील शेतकºयांचे आॅनलाइन संगणकीय सातबारा उताºयावर यंदाच्या खरीप हंगामाचे पीकपेºयांची नोंदणी झाली नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. शेतकºयांची ज्वारी वा मका पिकांची मळणी होऊन दुष्काळाच्या झळा बसलेले जेमतेम उत्पादन घरात येऊनही शासनाच्या आॅनलाइन संगणकीय सातबारा उताºयावर मात्र त्या पिकांच्या पेºयाची नोंद झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर नोंदणी करताना तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या यंत्रणेकडून शेतकºयांना नाव नोंदणीच्या रांगेतून बाहेर काढून हाकलून लावण्यात येत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.
आॅनलाइन संगणकीय सातबारा उताºयावर संबंधित महसुली सजा तलाठी यांनी सही शिक्क्यानिशी हस्तलिखित ज्वारी वा मका पिकांचा पीक पेरा लावून दिला तरी, हस्तलिखित पीकपेºयांची नोंदणी असलेल्या सातबारा उताºयाची आॅनलाइन नोंदणी करताना स्वीकृती होत नसल्याची बाब सांगून खरेदी विक्री संघाचे संबंधित यंत्रणेकडून ज्वारी वा मका खरेदीच्या नोंदणीसाठी स्पष्ट नकार दिला जात आहे. त्यामुळे आपलाच शेतमाल असताना त्याला विकण्याची शेतकºयाला चोरी झाली असल्याने शेतकरी वर्गातून कमालीचा असंतोष धुमसत आहे.
तत्संबंधी काही शेतकºयांनी थेट तहसीलदारांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संबंधित सजा तलाठ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. किंबहुना, संबंधित सजा तलाठी आॅनलाइन पीकपेºयांची नोंदणीला मंडळाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाल्याशिवाय संगणकीय सातबारा उताºयावर आॅनलाइन पेरा नोंदवून देण्यास असमर्थता व्यक्त करीत असल्याने संबंधित शेतकºयांची मोठी कुचंबणा झाली आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे शेतकºयांना आपल्याच शेतातील शेतमाल शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याची चोरी झाल्याने शेतकरीवर्गातूून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
एकीकडे दुष्काळाच्या झळा बसत असताना शेतकºयांना आपला शेतमाल विकण्यासाठी प्रशासनाशी लढा द्यावा लागत असल्याची बाब शासनाच्या संवेदना बोथट झाल्याची प्रचिती देणाºया असल्याचा सूर संतप्त शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या ज्वारी खरेदी केंद्रावर ज्वारी विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी गेलो असता माज्या आॅनलाइन सातबारा उताºयावर तलाठ्यांनी हस्तलिखित केलेल्या पीकपेºयांची नोंदणी पाहून रांगेतील सोळाव्या क्रमांकावरून मला हाकलून देण्यात आले. खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्यवस्थापनाकडे दाद मागितली त्यांनी असमर्थता व्यक्त केली. सकाळी तहसीलदार कार्यालयात नसल्याने त्यांचे मुख्यालयावर गेलो. त्यांनी गावातल्या तलाठ्याकडे जा. म्हणून परत केले.
- दिवाकर बिसन पाटील, ज्वारी उत्पादक शेतकरी
आॅनलाईन सातबारा उताºयावर हस्तलिखित पीकपेºयांची नोंदणी केली असली तरी आॅनलाइन खरेदीसाठी नोंदणी करताना स्कॅनिंग करताना तशा प्रकारच्या सातबारा उताºयांची नोंद त्या वेबसाईटवर स्वीकारली जात नसल्याची अडचण आहे.
- प्रशांत पाटील, ग्रेडर, ज्वारी खरेदी केंद्र