शासकीय केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:14 PM2019-03-17T12:14:13+5:302019-03-17T12:14:45+5:30

नऊ ठिकाणी केंद्रे, कागदपत्रांचे स्कॅनिंग होणार

Registering for grocery purchase at government centers | शासकीय केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरु

Next


जळगाव / अमळनेर : जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी नाफेडर्फे नोंदणी सुरु झाली आहेत. याचसोबत खरेदी देखील लगेचच सुरु करण्यात आली असून १५ मार्च ते १२ जून दरम्यान खरेदीचा कालावधी आहे.
जिल्ह्यात एकूण ९ ठिकाणी खरेदी केंद्र असून येथे जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात नोंदणी व खरेदी केली जात आहे. याचबरोबर अमळनेर, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर येथील तालुका सहकारी खरेदी - विक्री संघ तसेच बोदवड येथे पर्चेस अ‍ॅण्ड सेल युनियन, जामनेर, भडगाव व चाळीसगाव येथे शेतकरी सहकारी संघ आदी ठिकाणी हे खरेदी केंद्र आहेत. अर्थात तूर खरेदी सुरु असलेल्या केंद्रांवर ही नोंदणी व खरेदी केली जाणार आहे.
सर्व नोंदणी ही आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. ज्या तालुक्यात शेत जमीन असेल त्या तालुक्यात खरेदी केंद्र नसल्यास अशा शेतकऱ्यांची नोंदणी शेजारील तालुक्यात करता येईल. मात्र शेजारील जिल्ह्यातील नोंदणी करु नये, अशा सूचना जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी द्ल्यिा आहेत. नोंदणी करताना आधार, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच चना पिकाची आॅनलाईन नोंद असलेल्या वर्षाचा ७/१२उतारा सादर करायचा आहे. हस्तलिखित उतारा ग्राह्य धरला जाणार नाही. शेतकºयाचा मोबाईल नंबरही खरेदी केंद्रावर घेतला जाणार आहे. तसेच शेतकºयाची नोंदणी करताना सर्व कागदपत्रांची स्कॅनींग ते एन. ई. एम. एल. पोर्टलवर अपलोड करायचे आहेत, अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत.
आधारभूत दर ४६२०
शासनाने यंदाच्या हंगामासाठी ४६२० रुपये इतका आधारभूत दर जाहीर केला आहे. खरेदी नोंदणीचा कालावधी ११ मार्चपासून असून खरेदीचा कालावधी १५ मार्च ते १२ जून दरम्यान आहे.

Web Title: Registering for grocery purchase at government centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.