जळगावात उडीद-मूग खरेदी केंद्रावर ४ हजार ३५० शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:36 PM2018-10-31T12:36:38+5:302018-10-31T12:37:08+5:30

अमळनेरचे केंद्र सुरू

Registration of 4 thousand 350 farmers in Urad-moog shopping center in Jalgaon | जळगावात उडीद-मूग खरेदी केंद्रावर ४ हजार ३५० शेतकऱ्यांची नोंदणी

जळगावात उडीद-मूग खरेदी केंद्रावर ४ हजार ३५० शेतकऱ्यांची नोंदणी

Next

जळगाव : जिल्ह्यातील ३ उडीद-मूग-सोयाबीन खरेदी केंद्रांपैकी अमळनेर येथील खरेदी केंद्र अखेर मंगळवारी सुरू झाले. तर पाचोरा व जळगाव येथील खरेदी केंद्र दोन दिवसात सुरू होतील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान या तिन्ही केंद्रांवर मिळून सुमारे ४ हजार ३५० शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे.
शासनाने मुगाला ६९७५ रूपये, उडीद ५६०० तर सोयाबीनला ३३०० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. आॅनलाईन नोंदणीची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंत होती. त्यानुसार जळगाव केंद्रावर या मुदतीत सुमारे २ हजार शेतकºयांनी, पाचोरा केंद्रावर ५५० तर अमळनेर केंद्रावर सुमारे १८०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

Web Title: Registration of 4 thousand 350 farmers in Urad-moog shopping center in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.