जळगाव जिल्ह्यातील दप्तर नोंदणी, वसुलीवरून प्रांत, तहसीलदारांवर प्रश्नांची सरबत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:53 PM2017-12-21T12:53:15+5:302017-12-21T12:53:26+5:30
दुस-या दिवशीही झाडाझडती
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21- शासकीय वसुली व दप्तर नोंदणी का रेंगाळली, त्याचा काय पाठपुरावा केला यासह वेगवेगळ्य़ा प्रश्नांची सरबत्ती करीत विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी बुधवारी महसूल विभागाचा आढावा घेताना तहसीलदारांची कानउघडणी केली. तसेच प्रांताधिका:यांनी यामध्ये लक्ष देत वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे असल्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान आता कामात सुधारणा करा, मी पुन्हा फेब्रुवारी महिन्यात आढावा घेईल, अशीही तंबी त्यांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील महसूल अधिका:यांची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, वनविभागाचे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त दिलीप स्वामी, उन्मेश महाजन, आरडीसी राहुल मुंडके, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचा आढावा मंगळवारी घेतल्यानंतर महसूल विभागाचाही आढावा तब्बल पाच तास घेण्यात आला.
वर्षानुवर्षे दप्तर तपासले नाही
तलाठय़ांकडे चुकीच्या नोंदी होणे, नोंदी रेंगाळणे यासाठी तलाठय़ांचे दप्तर वेळोवेळी तपासले का, वर्षानुवर्षापासून ते का रेंगाळले अशी विचारणाही आयुक्तांनी केली.
माहिती बरोबर का नाही ?
आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांनी आढावा घेताना विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तहसीलदारांवर वेगवेगळ्य़ा प्रश्नांची सरबत्ती केली. आणलेली माहिती पुरेसी नसल्याने त्याविषयी माहिती देता न आल्याने माहिती का नाही, असे प्रश्न आयुक्तांनी केले असता राहून गेल्याचे तहसीलदारांचे म्हणणे होते. त्यावर पुन्हा कसे राहून गेले अशी उलट तपासणी केली असता अधिका:यांची भंबेरी उडाली.
वसुलीसाठी काय केले?.. शासकीय वसुली करताना ती का रेंगाळली, वसुलीची टक्केवारी कमी का आहे, वसुली होत नसेल तर संबंधितांना नोटीस दिल्या का अथवा काय प्रयत्न केले, असा जाब आयुक्तांनी तहसीलदारांना विचारण्यात आला. त्यावेळी उपस्थित निरुत्तर झाले.
मोबाईल टॉवरची यादी सोबत नाही
वसुलीच्या प्रश्नामध्ये मोबाईल टॉवरची झालेली व वसुली व थकबाकी सांगण्यात आली. त्यावेळी आयुक्तांनी मोबाईल टॉवरच्या याद्या सांगा, असे सांगताच याद्या नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यावरून आता कामात सुधारणा करा, अशा सूचना संबंधितांना दिल्या.