म्हसावद येथे शिवसेना सदस्य नोंदणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:40+5:302021-06-20T04:13:40+5:30
यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक महानंदा पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, पं. स. सभापती ...
यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक महानंदा पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, पं. स. सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, उपसभापती संगीता चिंचोरे, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, सरपंच गोविंदा पवार, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, विभाग प्रमुख सुरेश गोलांडे, विजय आमले, नारायण चव्हाण, सुनील बडगुजर, पंकज धनगर, महेंद्र राजपूत, चांदसर सरपंच सचिन पवार, विष्णू चिंचोरे, हौसीलाल परदेशी, शेख अहमद शहा, मीना चिंचोरे, समाधान चिंचोरे, ॲड. शीतल चिंचोरे, अनिल पाटील, गोरख पाटील, विश्वनाथ मंडपे, सुनील मराठे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले तर सभापती नंदलाल पाटील यांनी आभार मानले.
बाळासाहेबांनी दिलेल्या बाळकडूमुळे शिवसेनेचा वटवृक्ष
एक नेता, एक झेंडा आणि एक विचार या ध्येयावरून चालण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या बाळकडूमुळे आज शिवसेनेचा वटवृक्ष झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या वेळी केले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेब यांचा मूलमंत्र प्रमाण मानून लाखो शिवसैनिक पक्षात सक्रीय झाले.
शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपण सदस्य नोंदणी उपक्रम सुरू केला असून यात तालुका प्रमुखांनी तालुक्यातून पंधरा हजार शिवसैनिकांच्या नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.