ऐनवेळी एबी फॉर्म नाकारल्याने संताप

By admin | Published: February 2, 2017 01:14 AM2017-02-02T01:14:27+5:302017-02-02T01:14:27+5:30

भाजपा कार्यालयातील घटना: प्रशांत पाटील व संजय भोळे यांच्यात खडाजंगी

Regrettably refusing AB form | ऐनवेळी एबी फॉर्म नाकारल्याने संताप

ऐनवेळी एबी फॉर्म नाकारल्याने संताप

Next


जळगाव : भाजपाने आसोदा ममुराबाद गटात विदगाव येथील सिमा प्रशांत पाटील यांची उमेदवारी 28 जानेवारी रोजी जाहीर केली होती. पण सिमा पाटील यांना उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही एबी फॉर्म दिला नाही. या गटात सिमा पाटील यांची जाहीर उमेदवारी मागे घेऊन आसोदा येथील रुपाली संजय भोळे यांना एबी फॉर्म देण्यात        आला.
आपल्याला ऐनवेळी डावलले, गटबाजी केली म्हणून व्यथा मांडण्यासाठी बुधवारी दुपारी सिमा पाटील यांचे पती प्रशांत पाटील हे जामनेर येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी गेले. महाजन यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबत पाटील यांनी माहिती दिली. तसेच नाराजी व्यक्त केली.
कानळदा गटातही भाजपात गटबाजी
भाजपाने कानळदा गटात विजय भिकन सोनवणे यांना उमेदवारी डावलल्याने विजय सोनवणे यांनी कानळदा गणात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कानळदा गणातील भाजपाचे कार्यकर्ते संजय चौधरी यांनाही डावलल्याने त्यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. भोकर गणातही शालीक पाटील यांना डावलल्याने त्यांचीही समजूत काढण्यात आल्याची माहिती मिळाली.
भाजपातील गटबाजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आली. आसोदा ममुराबाद या जि.प.गटात मागील पंचवार्षिकमध्ये संजय भोळे यांचा काँग्रेसचे बळीरामदादा सोनवणे यांनी पराभव केला होता. या वेळेस भाजपाने या गटात विजय मिळविण्यासाठी कोळी, लेवा पाटीदार यांची एकगठ्ठा मतांची खेळी ्रकरीत प्रशांत पाटील यांच्या पत्नी सिमा पाटील यांना उमेदवारी दिली.
28 रोजी त्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रपरिषदेत जाहीर केलेल्या यादीत सिमा पाटील यांचे नाव होते. पण नंतर आसोदा व परिसरातील लेवा पाटीदार समाजातील व्यक्तींनी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिका:यांची भेट घेतली व या गटात लेवा पाटीदार व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा मुद्दा रेटून धरल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Regrettably refusing AB form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.