वॉटरग्रेसच्या ‘खुशी’ ला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:14 PM2020-12-23T21:14:45+5:302020-12-23T21:14:55+5:30

नगरसेवकांची घाबरगुंडी : व्हॉट्सॲप कॉलचीही चौकशी होणार ? 

Reject Watergrass's 'happiness' | वॉटरग्रेसच्या ‘खुशी’ ला नकार

वॉटरग्रेसच्या ‘खुशी’ ला नकार

Next

जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यात काम सुरु केल्यानंतर नगरसेवकांच्या तक्रारी बंद झाल्या आहेत. मात्र, यामागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप सातत्याने होत असून, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी थेट ६० नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून महिन्याला १५ हजार रुपयांप्रमाणे हप्ता घेतल्याचा आरोप केला होता. मात्र, सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलीसांनी केलेल्या तपासणीत वॉटरग्रेसचे कागदपत्रे व डायरी सापडल्याने या महिन्याची वॉटरग्रेसची खुशी ला अनेक नगरसेवकांनी दाराबाहेरूनच नकार दिल्याचे समोर आले आहे.

मनपाकडून सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिल्यानंतर हा मक्ता चांगलाच गाजत आहे. पहिल्या टप्प्यात कामाच्या तक्रारीनंतर या कंपनीचे काम थांबविण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांचा ह्यब्रेकह्ण नंतर पून्हा वॉटरग्रेसच्या कामाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात वॉटरग्रेसच्या कामाच्या तक्रारी थांबल्या असल्या तरी नगरसेवकांबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून १५ हजारांची खुशी मिळत असल्याचे आरोप अनेकांकडून होत आहेत.


डायरीतील नावे अन‌् भिती वाढली
बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलीसांनी तपासणी केल्यानंतर याठिकाणी वॉटरग्रेसचे कागदपत्रेही आढळून आले. तसेच पोलीसांना याठिकाणी डायरी सापडली असून, या डायरीत काही जणांचे शॉर्ट नावे सापडली आहेत अन‌् त्यापुढे काही आकडे देखील आहेत. अशा परिस्थीतीत पोलीसांकडून चौकशी होण्याच्या शक्यतेने ठराविक नगरसेवकांमध्ये भिती वाढली आहे. यामुळे अनेकांनी या महिन्याचा ह्यवॉटरग्रेसह्ण च्या ह्यखुशीह्णला दुरूनच नकार दिला आहे. दरम्यान, काही मनपा कर्मचाऱ्यांनीही ही रक्कम नाकारली असल्याचीही माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे. बड्या नगरसेवकाकडे हे वाटपाचे काम होते. मात्र, त्यानेही रक्कम देण्यास व व्हॉट्सॲपवरून कॉल करण्यासही नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर ज्या नगरसेवकांनी ही रक्कम घेतली होती, त्यापैकी अनेकजण ही रक्कम परत करण्याचा तयारीत आहेत.

Web Title: Reject Watergrass's 'happiness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.