फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 AM2020-12-17T04:41:51+5:302020-12-17T04:41:51+5:30

जळगाव : डाटा फिडींगच्या कामात तरुणीची ३ लाख ४६ हजार ७०० रुपयात फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात विरेन नितीन बारणे व ...

Rejected pre-arrest in fraud case | फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व फेटाळला

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व फेटाळला

Next

जळगाव : डाटा फिडींगच्या कामात तरुणीची ३ लाख ४६ हजार ७०० रुपयात फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात विरेन नितीन बारणे व सरफराज गुलाब अख्तर शेख (रा.सुरत, गुजरात) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. फिर्यादी तरुणीच्या बाबतीत ज्या उपकरणांचा वापर झालेला आहे, ती सर्व उपकरणे संशयितांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दोघांना अटक करणे गरजेचे असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी केला. न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात दोघांनी अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी ३० ऑगस्ट २०१७ रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

फसवणूक प्रकरणात जामीन फेटाळला

जळगाव : ठेकेदारीच्या कामातून ५४ लाख ६७ हजार ५०० रुपयात फसवणूक झाल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या विश्वंभर पांडूरंग तायडे (रा.मलकापूर) याचा जामीन अर्ज बुधवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. यापूर्वी एरंडोल न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला होता. सरकारतर्फे ॲड.सुरेंद्र काबरा तर फिर्यादीतर्फे ॲड.महेश काबरा व अॅड.सूरज जहांगीर यांनी काम पाहिले. ११ नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलिसांनी तायडे याला अटक केली होती. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत भूजल सर्व्हेक्षण व विकास संरक्षण विभागाचे ग्राऊंड बंधारा, नाला बंधारा यांचे काम पूर्ण झाल्यानंतरही ठेकेदार राजीव नंदलाल मणियार यांना मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे मणियार यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल होता.

Web Title: Rejected pre-arrest in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.