रावेर तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी संस्थेचा दूध खरेदीस नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 04:43 PM2018-12-02T16:43:06+5:302018-12-02T16:44:03+5:30
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादकांचे देय पेमेंट अनियमित येत असल्याच्या सबबीखाली सकाळ व सायंकाळी ५० लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या केवळ एकाच दूध उत्पादक शेतकºयाचे दूध खरेदी करण्यास तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी सोसायटीने ठेंगा दाखवला आहे.
रावेर, जि.जळगाव : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादकांचे देय पेमेंट अनियमित येत असल्याच्या सबबीखाली सकाळ व सायंकाळी ५० लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या केवळ एकाच दूध उत्पादक शेतकºयाचे दूध खरेदी करण्यास तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी सोसायटीने ठेंगा दाखवला आहे. सदर संस्थाचालक व प्रशासनाने राजकीय आकसापोटी अवसानघातकी निर्णय घेऊन अन्याय केल्याची तक्रार दूध उत्पादक जगदीश महाजन यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे केली आहे.
वाघोड येथील दूध उत्पादक शेतकरी जगदीश सुधाकर महाजन यांच्या तक्रारीतील आशय असा की, शेतीला जोडधंदा म्हणून १५ म्हशींचे त्यांनी पशुपालन केले आहे. बºहाणपूर येथील खासगी व्यापाºयाकडे ते सकाळी व सायंकाळी असे एकूण ५० लीटर दूध पुरवठा करीत होते. दरम्यान, सदर व्यापाºयाने दूध खरेदीस नकार दिल्याने गेल्या १५ दिवसांपासून ते गावातील सहकारी दूध उत्पादक सोसायटीत दूध पुरवठा करीत होते. सदर संस्थेचे चेअरमन व सचिव यांनी संचालक मंडळाच्या स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे आज अचानक सायंकाळी आपले दूध खरेदी करू शकणार नसल्याची लेखी सूचना देण्याचा निर्णय घेऊन अन्याय केल्याचा आरोप केला आहे.
या संस्थेकडे दुधाच्या पेमेंटची कोणतीही मागणी केली नसताना मात्र थेट जिल्हा दूध उत्पादक संघावर खापर फोडत संघाने प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे व जिल्हा संघाकडून दूध उत्पादकांना देय पेमेंट अनियमित मिळत असल्याने व संस्थेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची अवास्तव कारणे दाखवून दूध खरेदी करू शकत नसल्याची दिलेली लेखी सूचना अन्याय करणारी व अवसानघातकी असल्याचा आरोप केला आहे. जिल्हा दूध संघाच्या पेमेंटमध्ये अनियमितता असेल व प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात केली जात असेल व सोसायटीची परिस्थिती नाजूक असेल तर त्याचा परिणाम म्हणून केवळ एकट्या दूध उत्पादकाचेच ५० लीटर दूध नाकारण्याची मनमानी कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे.