‘नाते जुळले मनाशी मनाचे...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:15 PM2019-12-02T20:15:42+5:302019-12-02T20:16:01+5:30
व्हॉटस्अॅप ग्रुपने जुळल्या १०१ रेशीमगाठी : परिट समाजाची आदर्श वाटचाल
जळगाव : जिल्ह्यातील एका युवकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजसेवा सुरु करून दिली. त्याने व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करून युवक-युवतींना मोफत स्थळ देवून विवाह जुळवून देण्यास प्रारंभ केला आहे. एका वर्षातच १०१ युवक-युवतींना मनपसंत जीवनसाथी मिळण्यास मदत झाली आहे.
शंभू संतोष रोकडे असे या युवकाचे नाव आहे.
परिट समाजातील विधवा, विधूर, घटस्फोटीत यांचेही मोठ्याप्रमाणावर ग्रुपच्यामाध्यमातून विवाह जुळले आहेत. याच ग्रुपच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यातील मिळून ५२०पेक्षा जास्त विवाह लावण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे विवाहानंर ग्रुपचे सदस्य आशिर्वाद देण्यासाठी जातात.
या ग्रुपच्या माध्समातून एका वर्षात औरंगाबाद, जळगाव, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड अशा ५२० युवक-युवतींची मने जुळली.