वाळू वाहतुकीवर निर्र्बंध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 08:20 PM2019-04-01T20:20:43+5:302019-04-01T20:22:24+5:30
मुक्ताईनगर शहरातील प्रभाग बारामध्ये रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण काम सुरू आहे. अशात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कामात अडथळा निर्माण होतो येथून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना या प्रभागाच्या नगरसेवकाने दिले आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील प्रभाग बारामध्ये रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण काम सुरू आहे. अशात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कामात अडथळा निर्माण होतो येथून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना या प्रभागाच्या नगरसेवकाने दिले आहे.
शहरातील प्रवर्तन चौकात सीसीटीव्ही कॅमेरे चुकविण्यासाठी बºहाणपूर रोडवरील मुस्लीम कब्रस्थानामागून व भोई वाड्याच्या रस्त्याने प्रभाग क्रमांक बारामधून वाळू तस्करीचा चोरटा मार्ग तयार केला आहे. दिवस व रात्रभर येथून वाळू ट्रॅक्टरमधून वाहून नेली जाते. गल्लीबोळातून भरधाव ट्रॅक्टर वाहतूक होत असल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहे. भरधाव वाहणाºया वाळू वाहतूकच्या ट्रॅक्टरमुळे रस्त्यावर चालणारी लहान-मुले वयस्कर नागरिकांना धोक्याचे बनले आहे.
अशात प्रभाग क्रमांक बारामध्ये रस्ते डांबरीकरण व मजबुती करणाचे काम सुरू आहे. कामासाठी पडलेल्या गिट्टीचे गंजावरून हे वाळूचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावू लागले आहे. रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे. याबाबत प्रभाग क्रमांक बाराचे नगरसेवक संतोष मराठे यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांना लेखी तक्रार दिली आहे. या प्रभागातून होणाºया अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.