भुसावळ येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:27 PM2018-12-16T17:27:05+5:302018-12-16T17:29:29+5:30
भुसावळ तालुक्यासह शहरात विकास कामाचा आराखडा सुरूच ठेवून जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. भुसावळ बसस्थानकावर आमदार निधीतून लावण्यात आलेल्या सिमेंट बाकांच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यासह शहरात विकास कामाचा आराखडा सुरूच ठेवून जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. भुसावळ बसस्थानकावर आमदार निधीतून लावण्यात आलेल्या सिमेंट बाकांच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.
दरम्यान, भुसावळ बसस्थानकाची राज्यात नव्हे तर रेल्वेमुळे देशात ओळख आहे व तेथे दयनीय अवस्था आहे. बाक ठेवण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांच्या हस्तेही फीत कापून बाकांचे लोकार्पण झाले.
यावेळी पुढे बोलताना आमदार सावकारे पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी, चौक, स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना बाकांअभावी बैठकीची कुठलीही व्यवस्था नव्हती. जनतेच्या सुविधेसाठी भुसावळ बसस्थानक व अन्य ठिकाणी १५, तर वरणगाव येथे १७ बाके लावण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळत असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी प्रा.सुनील नेवे, माजी उपनगराध्यक्ष हाजी शफी पहेलवान, युवराज लोणारी, बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, प्रा.दिनेश राठी, किरण कोलते, किशोर पाटील, मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, शैलेजा पाटील, विभागीय अभियंता आर.व्ही.चव्हाण, कनिष्ठ अभियंता एस.यु.कुरेशी, बी.एम.पठार, आगार व्यवस्थापक हरीष भोई, स्थानकप्रमुख पी.बी.भोई, एस.टी. कॅन्टीन असोसिएशनचे अध्यक्ष राजेश सैनी, वाहतूक नियंत्रक व्ही.सी.वानखेडे, अनिकेत पाटील, पवन बुंदेले, एस.बी.शेळके, अनिल पाटील, सुरेश ढंढोरे, प्रवीण जवरे, सुरेश ढंढोरे, सुरेंद्र सिंग, अशोक हिगणे, एटीआय आर.एस.पाटील, राजेंद्र आवटे, ए.जे.अंबोले, दीपक कोळी आदी उपस्थित होते.
दरम्यान, कॅन्टीनलगत असलेल्या गटारीतील सांडपाणी जाण्यासाठी असलेली गटार रेल्वे विभागाने बंद केल्याने तत्काळ त्यांनी विभागीय अभियंता तोमर,अनुभाग अभियंता देशपांडे यांना बोलवून घेत चर्चा करून प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना केली.