भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील पिनाका पॉड संरक्षण प्रकल्पाचे 8 रोजी लोकार्पण
By Admin | Published: July 6, 2017 12:13 PM2017-07-06T12:13:04+5:302017-07-06T12:13:04+5:30
पिकाना पॉड प्रकल्प आणि पॉवडर कोटींग प्लाँट या दोन प्रकल्पांचे लोकार्पण 8 जुलै रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होईल.
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.6 - भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील संरक्षणदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण असलेला पिकाना पॉड प्रकल्प आणि पॉवडर कोटींग प्लाँट या दोन प्रकल्पांचे लोकार्पण 8 जुलै रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होईल.
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत 28 एकर क्षेत्रात अत्याधुनिक आणि भारतीय लष्कराची गरज ओळखून बांधण्यात येत असलेला पिनाका पॉड असेंबल प्रणाली अंतर्गत पिनाका पॉड प्रकल्पाचे लोकार्पण होईल. कोलकोत्ता येथील ऑर्डनन्स बोर्डाचे उपाध्यक्ष, संचालक, व संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रसंगी उपस्थितीत राहतील. संरक्षण राज्यमंत्री येणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे, असे भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे व्यवस्थापक (जीएम) आर.एस.ठाकूर यांनी कळविले.