भुसावळवासीयांना दिलासा : ६५ अहवाल आले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:18 PM2020-05-16T12:18:59+5:302020-05-16T12:22:00+5:30
भुसावळवासीयांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
भुसावळ : शहरात कोरोनाने कहर केला आहे. मात्र शुक्रवार, दि.१५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील तब्बल ६५ जणांचे अहवाल निगेटिव आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
शहरात २५ एप्रिलपासून कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला आहे. गेल्या वीस दिवसात शहरात तब्बल ४१ रूग्ण बाधित झाले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक भाग सिल करण्यात आला आहे. तर रुग्णांच्या संपर्कातील अनेक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील ६५ जणांचे अहवाल शुक्रवार, १५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. यात सिंधी कॉलनीतील तीन, काझी प्लॉटमधील ६, इंदिरानगरमधील २, जाम मोहल्ला येथील सहा व नगरपालिकेच्या २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २२ रुग्णांचे पत्ते मात्र समजू शकले नाही.
दरम्यान, कोरण्याचा वाढता प्रभाव पाहता आ. संजय सावकारे यांनी १३ रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन १४ तारखेपासून चार दिवस शहर पूर्णपणे बंद करा असे आवाहन केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या आवाहनास प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन दिवसापासून शहरात दवाखाने, मेडिकल, दूध, आदी महत्वाचे व जीवनाश्यक व्यवसाय सोडून कडकडीत बंद असल्याचे दिसून येत आहे.