ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 08:06 PM2018-05-22T20:06:19+5:302018-05-22T20:06:19+5:30
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानाचा सामना करत असलेल्या जळगावकरांना मंगळवारी सकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सकाळी ऊन सावलीचा खेळ पहायला मिळाला.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२२ - गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानाचा सामना करत असलेल्या जळगावकरांना मंगळवारी सकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सकाळी ऊन सावलीचा खेळ पहायला मिळाला. वातावरणात आर्द्रता वाढल्याने घामाच्या धारा लागल्या.दुपारी १२ नंतर पुन्हा उन्हाचा तडाखा बसू लागला. दरम्यान, पुढील आठवड्यात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
तापमानात चढ-उतार सुरु
शुक्रवारपासून तापमानात चढउतार होत आहे. या दिवशी कमाल तापमान ४३.२ तर किमान तापमान २७.८ नोंदविण्यात आले होते. शनिवारी त्यात वाढ होऊन अनुक्रमे ४५.० व २८.० झाले होते. रविवारी २ अंशानी घसरण होऊन ४३.२ व २७.८ पर्यंत नोंद झाली होती. सोमवारी पुन्हा तापमान ४५.० पर्यंत पोहचले होते. मंगळवारी ४४.२ तापमानाची नोंद करण्यात आली.
११ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण
मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरणहोते.पावसाच्यासरीबरसतातकीकाय? अशी स्थिती होती. मात्र ११ वाजेपासून पुन्हा तापमानात वाढ झाली. दुपारी ४४.२ तापमानाची नोंद झाली. आर्द्रता ६५ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने प्रचंड उकाडा होऊन घामाच्या धारा लागल्याहोत्या.
आगामी आठवडा तापमान कायम
मंगळवारी ढगाळ वातावरण असले तरी आठवडाभर कमाल व किमान तापमान कायम राहणार आहे. त्यामुळे किमान सात ते आठ दिवस जळगावकरांना प्रचंड उकाडा त्रस्त करणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात पावसाचे संकेत आहेत.
ताशी २४ किमी वेगाने वारे
मंगळवारी आंतरदेशीय वाऱ्यांचा वेग हा एका तासाला २० ते २४ किलोमिटर इतका होता. त्यामुळे तापमानातील दाहकता काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र दुपारनंतर रस्त्यावरील रहदारी नेहमीप्रमाणे कमी झाली होती.
पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. तसेच राज्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली नाही. कर्नाटक, मराठवाडा, छत्तीसगड असा तयार झालेला विक्षोभचा पट्टा आठ दिवसात जळगावकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात आठवड्याभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
उन्हाळी कपाशीची लागवड सुरु
आगामी आठवड्यात पावसाचे संकेत असल्याने पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकºयांनी उन्हाळी कापस व भुईमुगाची लागवड सुरु केली आहे. शेतातील आंतरमशागतीला वेग आला आहे. शेतात नागरटी, कचरा वेचणी ही कामे सुरु झाली आहे. शेतकºयांनी देखील बियाणे खरेदी आतापासून सुरु केली आहे.