प्रवाशांसाठी दिलासा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:28 AM2020-12-03T04:28:31+5:302020-12-03T04:28:31+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे ३१ डिसेंबरपर्यंत भुसावळ विभागातून जाणाऱ्या तब्बल अप/डाऊनमध्ये तब्बल ५० गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या ...

Relief for passengers; | प्रवाशांसाठी दिलासा;

प्रवाशांसाठी दिलासा;

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे ३१ डिसेंबरपर्यंत भुसावळ विभागातून जाणाऱ्या तब्बल अप/डाऊनमध्ये तब्बल ५० गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. आहे त्यात विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य चौकांमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे शहरांमध्ये नाहक फिरणाऱ्या दुचाकीस्वारांनी भीतीपोटी घरीच राहणे पसंत केले आहे. यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कमी झाल्याने गर्दी कमी झाली आहे. यामुळे कोरोनाला

नक्कीच आळा बसेल, शिवाय या कारवाईतून लाखोंची दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली.

पावसामुळे रब्बी पेरात वाढ

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रब्बी पेरण्यांना सुरुवात झाली आहे

तालुक्यात आतापर्यंत दोन हजार २०२ हेक्टरीवर रब्बी पेरणी झाली आहे. यात ५८१ हेक्‍टर गहू,

एक हजार ४५४- हरभरा, १६७ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. ६७ हेक्टरमध्ये कांद्याची लागवड

करण्यात आली. डिसेंबर अखेरपर्यंत रब्बी हंगामासाठी पेरणी केली जाते, यंदा गतवर्षीच्या तुलनेत हंगाम जास्त येण्याची शक्यता आहे.

कोविड रुग्णालय बंद करण्याची घाई नको

कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड केअर सेंटर बंद करण्याची घाई करू नये, अशी

अपेक्षा व्यक्त होत आहे. त्या ठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त सुविधा मिळाव्यात तसेच पहिल्या

लाटेचा अनुभव पाहता झालेल्या चुका पुन्हा होऊ नये, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

दहा महिन्यांनंतर झाली पालिका सभा

कोरोना काळापूर्वी झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा कोरोनाकाळात प्रथमच ऑनलाइन

घेण्यात आली. यामध्ये तब्बल २४२ विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र विरोधी गटाने पूर्वीच

मंजूर झालेले विषय व काम झालेले विषय पुन्हा घेतल्याने सभा बेकायदेशीर असल्याचे

सांगत सभेवर बहिष्कार टाकला. याशिवाय शहरात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम

निकृष्ट दर्जाचे आहे. यावरूनसुद्धा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

मैदानाचा विषय मार्गी लावावा

जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या

याशिवाय क्रीडाप्रेमींसाठी हक्काचे मैदान नाही, यासाठी लवकरात लवकर शहरातील डॉ.

बाबासाहेब आंबेडकर तसेच तालुका क्रीडा संकुल मैदान हे अद्ययावत करावे, अशी अपेक्षा

क्रीडापटू व पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Relief for passengers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.