रावेर शहर हद्दवाढीतील नागरिकांना पाणीपट्टीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:04 PM2020-08-19T19:04:28+5:302020-08-19T19:06:03+5:30

गत पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच बुधवारी सकाळी पालिकेची झूम मिटींग झाली.

Relief of water supply to the citizens of Raver city limits | रावेर शहर हद्दवाढीतील नागरिकांना पाणीपट्टीचा दिलासा

रावेर शहर हद्दवाढीतील नागरिकांना पाणीपट्टीचा दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्दे रावेर पालिकेच्या सभेत निर्णयहद्दवाढीतील नवीन कर प्रणालीच्या सर्वेक्षणाला मुदतवाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

रावेर, जि.जळगाव : शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या २७ वाढीव नागरी वसाहतीतील नागरिकांचा दुपटीतील साधारण पाणीपट्टी कराचा १ हजार ६०० रुपयांचा निम्मा बोझा कमी करून शहरवासीयांप्रमाणे नियमितपणे १ हजार ६०० रुपयांची आकारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. गत पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच बुधवारी सकाळी पालिकेची झूम मिटींग झाली.
शहराभोवती गत ३५ ते ४० वर्षांपासून उसने नागरिकत्व उपभोगताना २१२ शेतांमध्ये वसलेल्या २७ नागरी वसाहतींना शहरातील नागरिकांपेक्षा दुपटीने सर्वसाधारण पाणीपट्टीचा कर भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, गत नोव्हेंबर २०१९ पासून शासनाने शहर हद्दवाढीला अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या २७ नागरी वसाहतींमधील नागरिकांचा सर्वसाधारण पाणीपट्टीचा कर आता निम्म्याने कपात करून नियमीत शहरवासीयांप्रमाणे लागू करण्यात यावा अर्थात पूर्वीच्या दुपटीने आकारण्यात येणाºया साधारण पाणीपट्टी करात निम्मे कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न.पा.च्या पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच झालेल्या झूम मिटींगमध्ये सर्वानुुमते पारीत करण्यात आला. त्यामुळे शहरहद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नागरिकांच्या तीन हजार २०० रु. साधारण पाणीपट्टी कराप्रमाणे ३० लाखांपैकी १५ लाख रूपयांचा भुर्दंड माफ होणार असल्याचा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे शहर हद्दवाढीतील मालमत्तेचे सर्वेक्षण करणे दुरापास्त ठरले असल्याने नवीन करप्रणाली लागू करण्यासाठी सर्व्हेक्षणाला एक वर्ष मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय सर्वानुुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.
दरम्यान, ‘लोकमत’ने स्टेशनरोडच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असल्याने त्या रस्त्याच्या दुरुस्तीची लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी स्पष्ट केले.
न.पा.सभागृहातून नगराध्यक्षा दारा मोहंम्मद, उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सकाळी साडेअकरापासून झूम अ‍ॅप्सद्वारे संपर्कात होते. नगरसेवक प्रल्हाद महाजन, ललिता बर्वे, आसिफ मोहंमद, अ‍ॅड.सूरज चौधरी, सुधीर पाटील, सादीक शेख, असदुल्ला खाँ, यशवंत दलाल, संगीता वाणी, संगीता अग्रवाल, संगीता महाजन, रंजना गजरे, प्रकाश अग्रवाल, जगदीश घेटे अशा १६ नगरसेवकांनी झूम अ‍ॅप्स मिटींगमध्ये सहभाग घेतला.
शहरातील नळपाणीपुरवठा योजना २० ते २५ वर्षांपूर्वीची जीर्ण झाली आहे. यामुळे संपूर्ण विस्तारलेल्या शहरासाठी ३५ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहे. लवकरच तांत्रिक सहायकाचे रक्कम वर्ग करून नगरविकास मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याबाबत उहापोह झाला. किंबहुना, न.पा.प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शक्यतो नोव्हेंबरनंतर निधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने तत्संबंधी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सादर केली.

Web Title: Relief of water supply to the citizens of Raver city limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.