देहविक्रय व्यवसायात अडकलेल्या मुलींची सुटका

By Admin | Published: January 14, 2017 01:07 AM2017-01-14T01:07:18+5:302017-01-14T01:07:18+5:30

राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील इंदरगड येथील मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेणाºया मालकिणीला वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या ताफ्याने छापा टाकून रंगेहाथ पकडले.

Relieving girls in physical activity business | देहविक्रय व्यवसायात अडकलेल्या मुलींची सुटका

देहविक्रय व्यवसायात अडकलेल्या मुलींची सुटका

googlenewsNext


अमळनेर : राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील इंदरगड येथील मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेणाºया मालकिणीला वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या ताफ्याने छापा टाकून रंगेहाथ पकडले. ह्यपिटाह्ण अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा पीडित तरुणींना महिला सुधारगृहात रवाना करण्यात येणार आहे.
समाजसेवी फ्रिडम फर्म पुणेचे लायजन अधिकारी सत्यजित देसाई यांना अमळनेर येथे राजस्थानातील मुलींना डांबून ठेवून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संस्थेच्या कार्यकर्त्यांसह ११ रोजी येऊन खात्री केल्यावर जळगाव पोलिसांकडे तक्रार केली. मोक्षदा पाटील यांनी भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना पथक घेऊन नियोजित ठिकाणी छापा मारण्यास सांगितले. पथकाने कुंटणखाना मालकीण सुलतानबी रशीद शेख हिच्या घरी छापा टाकला असता राजस्थानातील तीन तरुणी आढळून आल्या. पीडित तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

दरम्यान पिडीत तरुणींनी त्यांची वये कागदोपत्री २० ते २२ दरम्यान सांगितली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले.
यांचा पथकात समावेश
सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या सपोनि सारिका खैरनार, वरणगाव पोलीस स्टेशनचे दिलीप गांगुर्डे, पोउनि युवराज अहिरे, हेडकॉन्स्टेबल शमीना तडवी, प्राची जोशी, विजया घेटे, यासीन पिंजारी, श्रीकांत ठाकूर, दिलीप कोळी, संदीप चव्हाण, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, सुनील शिंदे यांच्यासह २० कर्मचाºयांचा छापा मारणाºया पथकात समावेश होता.
        (वार्ताहर)

Web Title: Relieving girls in physical activity business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.