धर्म हा आचरणाचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:10 PM2019-08-26T13:10:04+5:302019-08-26T13:10:38+5:30
धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर ...
धर्माचे चार स्तंभ आहेत. त्यात सत्य, पवित्रता, तप, दया यांचा समावेश आहे. धमार्चा आधार करुणा आणि अहिंसा आहे .जीवांवर देखील आणि स्वत: वर देखील...! यात जाणून बुजून निष्काळजीपणा होत असतो. यालाच श्रीकृष्णाने धमार्ला ग्लानी येते असे म्हटले आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अवतार घेत असतात. जेव्हा धर्म आचरणाचा ºहास होतो, धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा तेव्हा हे ते अवतीर्ण होत असतात.
भक्ताचे रक्षण आणि दृष्टांचा विनाश तसेच धर्म तत्वांची स्थापना करण्यासाठी ते अवतार धारण करतो.
धर्म हा आचरणाचा विषय आहे, भांडणाचा नाही ,हे जेव्हा जगातल्या लोकांना कळेल तेव्हा ९९% समस्या नष्ट होतील. प्रत्येक बापाला आणि मुलीला निर्व्यसनी मुलगा पाहिजे आणि प्रत्येक परिवाराला एक चांगली सून हवी ......त्यामुळे सुरुवात आपल्या परिवरापासून करा,त्यांना चार तत्वांची पालन करायला शिकवा.
- चैतन्य जीवनदास, ईस्कॉन, जळगाव