धार्मिक पर्व...२०१८ मध्ये अधिक मासासह विविध पर्वणी योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 05:20 PM2017-12-21T17:20:33+5:302017-12-21T17:27:53+5:30
३ अंगारका चतुर्थी, २ गुरुपुष्य, चंद्रग्रहण, प्रदोषांचा संगम
प्रसाद धर्माधिकारी/आॅनलाईन लोकमत
नशिराबाद जि. जळगाव, दि.२१ : जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात विविध पर्वणींचा संगम आहे. यंदा गणेशभक्तांसाठी तीनदा अंगारक चतुर्थी तर दोन विनायक चतुर्थीला अंगारक योग असून दोनदा गुरुपुष्यांमृत पर्वकाल आहे. त्यासोबतच मलमास अर्थात् अधिकमास (धोंड्याचा महिना) पर्वणी आहे. वर्षभरात दोनदा खंडग्रास चंद्रग्रहण योग असणार आहे. तसेच शिवभक्तांसाठी अनन्यसाधारण महत्व असलेले ५ भौमप्रदोष, ४ सोमप्रदोष तर दोनदा शनिप्रदोषाचा योग आहे. त्यामुळे वर्षभर धार्मिक, कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
हिंदू धर्मात सण, उत्सवांसह प्रत्येक पर्व कालास मोठे महत्व आहे. त्यास अध्यात्मिक महत्वाचे असलेले स्थान पाहता, कथाभाग यांचाही या काळात संगम आहे. अधिकमासामुळे यंदाच्या वर्षाला विशेष महत्व आहे. दर तीन वर्षानंतर अधिकमास येत असतोे. १६ मे पासून अधिक मासास प्रारंभ होत आहे. १३ जून २०१८ ला मलमासाची सांगता होईल.
अंगारकी चतुर्थी-३ एप्रिल, ३१ जुलै, २५ डिसेंबर (संकष्टी चतुर्थी)
अंगारक योग-१४ आॅगस्ट, ११ डिसेंबर (विनायकी चतुर्थी)
गुरुपालट
११ आॅक्टोबर रोजी गुरुपालट होणार आहे. गुरुचा ‘वृश्चीक’ राशीत प्रवेश होईल.
खंडग्रास चंद्रग्रहण- ३१ जानेवारी व २७ जुलै
गुरुपुष्यामृत पर्व- ९ आॅगस्ट व ४ आॅक्टोबर
दरम्यान, यंदा १८ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबर २०१८ दरम्यान शुक्र अस्त आहे. तर १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर गुरु अस्त असल्याचे पंचांगात म्हटले आहे.
प्रदोषाची पर्वणी
भौम प्रदोष- १३, २७ फेब्रुवारी, १० जुलै, २० नोव्हेंबर, ४ डिसेंबर
सोम प्रदोष- ११, २५ जून, २२ आॅक्टोबर, ५ नोव्हेंबर
शनि प्रदोष- २६ मे, २२ सप्टेंबर.