रेमडेसीवीर बाजारातून गायब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:13 AM2021-04-03T04:13:36+5:302021-04-03T04:13:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना उपचारांमध्ये निकषात बसत असणाऱ्या रुग्णांना देण्यात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मेडिकलवर मिळत नसल्याच्या ...

Remdesivir disappears from the market? | रेमडेसीवीर बाजारातून गायब?

रेमडेसीवीर बाजारातून गायब?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना उपचारांमध्ये निकषात बसत असणाऱ्या रुग्णांना देण्यात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मेडिकलवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अचानक तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, तुटवड्याची किंवा रुग्णाला इंजेक्शन न मिळाल्याची एकही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे औषध निरीक्षक अनिल माणिकराव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

शहरातील पलोड डिस्ट्रीब्युटरकडे पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, औषध निरीक्षक व तहसीलदारांनी या ठिकाणी सर्व रेकॉर्डही तपासले असून कुठेही अनियमितता आढळून आली नसल्याचे माणिकराव यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी रेमडेसीवरचा काही साठा जळगावात येणार आहे.

शासकीय यंत्रणेत पुरेसा साठा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रेमडेसीवीरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली. तर ग्रामीण यंत्रणेतही हा साठा पुरेसा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

काय आहे प्रकार

कोविड हॉस्पीटलला जोडलेल्या मेडिकलमध्ये रेमडेसीवीर हे एमआरपी किमतीत विकले जात होते. याचा रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. अशा स्थितीत रुग्णांना कमी किमतीत हे मिळावे म्हणून केमिस्ट असोसिएशनने याची किंमत १२०० रुपये केली होती व त्यानुसार हे जनरल मेडिकलरवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. जेणेकरून रुग्णांना व नातेवाईकांचा आर्थिक भार कमी होईल, यासह हॉस्पिटलला जोडलेल्या अशा मेडिकलवर आमच्याकडूनच औषधी घेणे बंधनकारक नाही, असा बोर्डही लावण्यात आला होता. मात्र, एकत्रितच राज्यात सर्वत्र या इंजेक्शचा पुरवठा कमी आहे. शिवाय इंजेक्शन हे प्राधान्याने कोविड हॉस्पीटलला देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे जनरल मेडिकलवर हे इंजेक्शन मिळत नसल्याचे अनिल माणिकराव यांनी सांगितले. दरम्यान, एमआरपीपेक्षा कमी किमतीत विकण्याचे शासन कोविड सेंटर्सच्या मेडिकलला आवाहन करू शकत नाही, मात्र, जास्त किमतीत विकल्यास कारवाई करू शकते, असेही त्यांनी सांगितले.

कोट

उद्या साठा उपलब्ध होणार आहे. रुग्ण व नातेवाईकांनी यात सहकार्य करावे, एकदाच सर्व इंजेक्शन न घेता, दिवसाला आवश्यक तेवढे घ्यावे. जेणेकडून तुटवडा भासणार नाही. - सुनील भंगाळे, अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन.

Web Title: Remdesivir disappears from the market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.