जळगावातील 200 व्यापा:यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 09:03 PM2017-09-03T21:03:25+5:302017-09-03T21:05:06+5:30

खुलाशाने समाधान : जीएसटी लागू नसलेल्या मालाला नोंदणीची आवश्यकता नाही

Remedies to 200 industries in Jalgaon | जळगावातील 200 व्यापा:यांना दिलासा

जळगावातील 200 व्यापा:यांना दिलासा

Next
ठळक मुद्दे व्यापा:यांना दिलासादाळमिलला मात्र नोंदणी आवश्यक‘ग्रोमा’ संघटनेने दिले सरकारला पत्र

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 -  ज्या मालावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू नाही अशा अन्नधान्य व इतर मालाच्या व्यापा:यांना जीएसटी नोंदणी करणे गरजेचे नसल्याचा स्पष्ट खुलासा करण्यात आल्याने जळगावातील 200 व्यापा:यांना दिलासा मिळाला आहे. 
1 जुलै रोजी जीएसटी लागू होणार असल्याने त्यापूर्वीपासूनच व्यापा:यांची धावपळ सुरू होती. यात अनेक अडचणी आल्यातरी व्यापा:यांनी यात नोंदणी केली.  असे असले तरी अन्नधान्य व  ज्या मालांना जीएसटी लागू नाही, अशा व्यापा:यांनी काय करावे या बाबत व्यापा:यांमध्ये संभ्रम होता.  

‘ग्रोमा’ संघटनेने दिले सरकारला पत्र
रजिस्टर ट्रेडमार्क ब्रॅण्डेड तांदूळ, डाळी यांच्यावर जीएसटी लागू आहे, मात्र जे अन्नधान्य रजिस्टर ट्रेडमार्क नाही त्यांना जीएसटी लागू नाही व त्याचा जे व्यापार करतात त्यांनी मालाची विक्री, आयात, निर्यात कशी करावी या बाबत ‘द ग्रेन, राईस अॅण्ड ऑईलसीडस् र्मचट असोसिएशन’ (ग्रोमा) या संघटनेने संबंधित खात्यास 18 ऑगस्ट रोजी पत्र देऊन जीएसटीतील सेक्शन 23 आणि 24 या बाबत  स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार जीएसटी आयुक्तालयाने (मुंबई) 31 ऑगस्ट रोजी संघटनेला पत्र देऊन या बाबत स्पष्टीकरण केले. 
यात म्हटले आहे की, ज्या मालावर जीएसटी लागू नाही, त्या मालाच्या व्यापा:यांना नोंदणीची आवश्यकता नाही. यात व्यापारी  विनानोंदणी आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात, निर्यातही करू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  या सोबतच अशा व्यापा:यांनी नोंदणी केली असल्यास ते ती रद्द करू शकतात. 

या स्पष्टीकरणामुळे जळगावातील धान्य व इतर अशा 200 व्यापा:यांना दिलासा मिळाला आहे. तसे पाहता यापूर्वीच हा दिलासा होता, मात्र स्पष्ट निर्देश नसल्याने संभ्रम होता. मात्र या पत्रामुळे तो आता दूर झाला आहे. आता हे व्यापारी विनानोंदणी महाष्ट्रासह इतर राज्यात, राष्ट्रात माल पाठवू शकतात अथवा आणू शकतात. 

दाळमिलला मात्र नोंदणी आवश्यक
ब्रॅण्डेड डाळींवर पाच टक्के जीएसटी लागू असल्याने आता त्या डाळी विनाब्रॅण्ड विक्री होत आहे. त्यामुळे त्यांना जीएसटी लागत नाही, असे असले तरी दालमिलला नोंदणी आवश्यक राहणार आहे. कारण डाळींच्या  पॉलिशसाठी तेल,    पॅकिंगसाठी बारदान खरेदी या सर्व कारणांमुळे डालमिलला नोंदणी गरजेची असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ज्या मालाला जीएसटी लागत नाही, अशा मालाच्या व्यापा:यांच्या जीएसटी नोंदणीबाबत ‘ग्रोमा’ संघटनेने विचारणा केली होती. त्यानुसार संबंधित खात्याकडून स्पष्टीकरण मिळाल्याने जळगावातील 200 व्यापा:यांचा संभ्रम दूर होऊन दिलासा मिळाला आहे. 
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा अॅण्ड र्मचट असोसिएशन. 

Web Title: Remedies to 200 industries in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.