दारुबंदी विभागाला आता ‘रिमोट कंट्रोल’ची झिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:07 AM2018-02-18T00:07:11+5:302018-02-18T00:07:51+5:30
नियंत्रण ठेवण्यासाठी विभागनिहाय वरिष्ठ अधिकाºयांची नियुक्ती
कुंदन पाटील/आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १७ - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हानिहाय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागनिहाय वरिष्ठ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात नियंत्रण ठेवले जाणार असल्याने अधीक्षकांसह अन्य अधिकाºयांच्या कामकाज अहवालाचा रिमोट नियुक्त अधिकाºयांच्या हाती असणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार औरंगाबाद विभागाची सुत्रे सहायक आयुक्त तनुजा दांडेकर, नागपूरसाठी विश्वनाथ इंदिसे, कोल्हापूर विभागासाठी यतीन सावंत, पुणे विभागासाठी सुनिल चव्हाण तर नाशिक विभागासाठी प्रदीप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिन्यातून किमान दोनदा जिल्हानिहाय भेटी देऊन आढावा घेण्याची जबाबदारी या वरिष्ठ अधिकाºयांवर असेल. प्रशासन गतिमान आणि पारदर्शी होण्याच्यादृष्टीने संबंधित अधीक्षकांना सूचना देण्याची जबाबदारी या अधिकाºयांवर आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यातील ‘दारुबंदी’ विभागाच्या कामकाजातील बारकावे दर महिन्याला वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचणार आहेत.