महामार्गावर अतिक्रमण हटाव
By admin | Published: February 28, 2017 12:20 AM2017-02-28T00:20:31+5:302017-02-28T00:20:31+5:30
पोलीस स्टेशन, राजकीय पक्षांचेही फलक काढले : कारवाईस किरकोळ विरोध
जळगाव : महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या जागेवरील अतिक्रमण निर्मूलन मोहीमेस सोमवारी सकाळी ८ वाजता खोटे नगरपासून सुरूवात झाली. कारवाईत तालुका पोलीस स्टेशनचा फलक, शिवसेनेचा जमिनीवर उभारलेल्या सिमेंट काँक्रीट फलक, वाचनालयाचे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईत नगरसेवक समर्थकाची टपरी काढल्याने काही वेळ झालेला किरकोळ वाद वगळता मोहीमे शांततेत सुरू होती.
जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या बैठकीतील निर्णयात २७ व २८ फेब्रुवारी असे दोन दिवस महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार सकाळी ७ वाजेपासून खोटेनगर जवळ महापालिकेतील बांधकाम, इलेक्ट्रीकल, बांधकाम, नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच महामार्ग विकास प्राधिकरण, तहसील व पोलीस प्रशासनाचा मोठा ताफा या मोहीमेत सहभागी झाला होता.
प्रारंभी झाले हद्दीचे मार्किंग
प्रारंभी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी महामार्गाच्या ६० फुट जागेचा मध्य साधून दोन्ही बाजुने ३० फुटांवर मार्किंग करून त्यापुढे आलेल्या अतिक्रमणांवर कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर ८.३० वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात झाली. जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठ्या टपºया उचलण्यात येत होत्या. कारवाईच्या काळात कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे या ठिकाणी तळ ठोकून होते. या बरोबरच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यंकात पाटील यांच्यासह प्रचंड पोलीसाचा ताफा या ठिकाणी तैनात होता.
महामार्ग प्राधिकरणाचा ताफा
कारवाई स्थळी महामार्ग विकास प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख अरविंद काळे, प्रकल्प व्यवस्थापक अरविंद गंडी, प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र इंगळे आदी सकाळपासून तळ ठोकून होते. महामार्गाविषयीचे मोजमाप व अन्य मार्गदर्शन त्यांनी मनपा कर्मचाºयांना केले.
अशी झाली कारवाई
कारवाईत तालुका पोलीस स्टेशनचा दिशा दर्शक फलक, शिवसेनेचा बांधिव फलक, उपमहापौर ललित कोल्हे यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेले वाचनालयही हटविण्यात आले.
नगरसेविका पती पती मनोज चौधरी यांच्या समर्थकाची टपरी हटविताता एका लिंबाच्या झाडावर ती ढकल्याने हे चांगले बहरलेले झाड जमिनदोस्त झाले. मनपाचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी असताना त्यांनीही बघ्याची भूमिका घेतली.
कारवाई सुरू असताना टपºयांमधील सामान काढून घेण्यासाठी टपरी धारक व त्यांचे कुटुंबिय महिला वर्गही थडपडत असल्याचे दृश्य होते.
महापालिका आयुक्त जीवन सोनवणे हे ९.३० वाजता कारवाई स्थळी आले. त्यांनी कर्मचाºयांकडून माहिती घेतली.
मोहीमेच्या पहिल्याच दिवशी खोटेनगर ते मानराजपार्कपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले.
मंगळवारी मानराजपार्क ते गोदावरी कॉलेजपर्यतचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.