राम नगरातून कारचे स्पेअरपार्ट लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:37+5:302021-06-30T04:11:37+5:30

जळगाव : मेहरुणमधील राम नगरातून सतीश हिरालाल लुंकड (वय ३०) या व्यापाऱ्याच्या कारच्या इंजिन व सायलेन्सरला जोडणारे स्पेअरपार्ट चोरट्यांनी ...

Removed car spare parts from Ram Nagar | राम नगरातून कारचे स्पेअरपार्ट लांबविले

राम नगरातून कारचे स्पेअरपार्ट लांबविले

Next

जळगाव : मेहरुणमधील राम नगरातून सतीश हिरालाल लुंकड (वय ३०) या व्यापाऱ्याच्या कारच्या इंजिन व सायलेन्सरला जोडणारे स्पेअरपार्ट चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या पार्टची किंमत ३५ हजार रुपये आहे. २५ जूनच्या रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तपास प्रदीप पाटील करीत आहेत.

कानळदा येथून दुचाकी चोरी

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथून नंदू प्रभाकर बोरोले (वय ५०) यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ डी.जे.३२५७) २४ जून रोजी रात्री चोरी झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तपास अनिल मोरे करीत आहे.

मालवाहू रिक्षाच्या धडकेत दाम्पत्य जखमी

जळगाव : मालवाहू रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने सुनील परशुराम वर्मा (रा.आर.एल.कॉलनी, जळगाव) व त्यांच्या पत्नी या जखमी झाल्या आहेत. हा अपघात २८ जून रोजी दुपारी दीड वाजता नवजीवन सुपरशॉपच्या उड‌्डाणपुलाजवळ झाला. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरुध्द जिल्हा पेठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अती मद्यसेवनाने प्रौढाचा मृत्यू

जळगाव : अती मद्य सेवन केल्याने विठ्ठल धोंडू कोळी (वय ५५,रा.रामेश्वर कॉलनी) यांचा उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास नितीन पाटील करीत आहे.

पोलीस उपनिरीक्षक सांगवेकर निवृत्त

फोटो. ३० सीटीआर ५४

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील उपनिरीक्षक भाऊलाल लहानू सांगवेकर हे ३८ वर्षाच्या सेवेनंतर बुधवारी पोलीस दलातून निवृत्त होत आहे. त्यांनी नाशिक, धुळे येथेही त्यांनी सेवा बजावली आहे.

Web Title: Removed car spare parts from Ram Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.