तरूणीचा काढला लपून-छपून व्हीडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 09:36 PM2020-07-17T21:36:37+5:302020-07-17T21:36:51+5:30
जळगाव : बांधकाम कामगार तरूणाने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी खोली दिलेल्या घरमालक तरूणीचाच लपून-छपून व्हीडिओ क्लिप बनविल्याची धक्कादायक प्रकार शहरात ...
जळगाव : बांधकाम कामगार तरूणाने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी खोली दिलेल्या घरमालक तरूणीचाच लपून-छपून व्हीडिओ क्लिप बनविल्याची धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे़ याबाबत तरूणाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतिफ याकूब बेग (२०, रा़पिंप्राळा हुडको) असे व्हीडिओ बनविणाऱ्या भामट्याचे नाव आहे़ त्यास अटक करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरूणी ही आई सोबत वास्तव्यास आहे़ तरूणीच्या घराशेजारी असलेल्या रहिवाशाचे बांधकाम सुरू आहे़ त्यामुळे सिमेंट व बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी तरूणीच्या आईने बांधकाम कामगारांना खोली दिली़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक बांधकाम तरूणाने तरूणीच्या घराचा दरवाजा ठोठावला व नंतर त्या तरूणाने तरूणीला मेमरीकार्ड दिले व त्यात एक व्हीडिओ असल्याचे सांगितले़
मेमरीकार्डमध्ये आपले व्हीडिओ असल्याचा संशय आल्याने भेदरलेली तरूणीने संपूर्ण प्रकार शेजारच्यांना फोन करून सांगितला़ त्यांनी तरूणीला संबंधित मेमरी कार्डमधील व्हीडिओ हा तिच्या लॅपटॉपमध्ये तपासण्याचा सल्ला दिला़ त्यात तिला तिचा लपून-छपून काढलेला एक मिनिटाचा व्हीडिओ त्यात दिसून आला़ तरूणीने लागलीच एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली़ काही वेळातच पोलिसांनी तरूणीच्या घरी धाव घेतली़ यावेळी पोलीस कर्मचारी मुकेश पाटील, हेमंत काळसकर, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, शांताराम पाटील यांनी त्या बांधकाम कामगार तरूणाला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव आतिफ याकूब बेग असे सांगितले़ त्यानंतर त्याला अटक करण्यात आली़ दरम्यान, याप्रकरणी त्या तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़