रेल्वे हद्दीतील अमर स्टोर ते स्टेशन रोड नूतनीकरण करा-रिपब्लिकन पार्टीतर्फे रेल्वे प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 03:14 PM2020-11-19T15:14:18+5:302020-11-19T15:15:18+5:30

रेल्वे हद्दीतील अमर स्टोअर ते स्टेशन रोड रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे.

Renew Immortal Store to Station Road in Railway Boundary - Statement to the Railway Administration by the Republican Party | रेल्वे हद्दीतील अमर स्टोर ते स्टेशन रोड नूतनीकरण करा-रिपब्लिकन पार्टीतर्फे रेल्वे प्रशासनास निवेदन

रेल्वे हद्दीतील अमर स्टोर ते स्टेशन रोड नूतनीकरण करा-रिपब्लिकन पार्टीतर्फे रेल्वे प्रशासनास निवेदन

Next

भुसावळ : रेल्वे हद्दीतील अमर स्टोअर ते स्टेशन रोड रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून रस्त्यामध्ये अंतरा अंतरावर फूटभर खड्डे झालेले आहे. यामुळे येता-जाता नागरिकांना कसरत करावी लागते. रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे याबाबत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी एडीआरएम मनोज सिन्हा यांना निवेदन सादर केले.
शहरातील अत्यंत महत्वाच्या अशा रेल्वे हद्दीतील अमर स्टोअर -ते स्टेशनपर्यंत रस्त्याची अत्यंत विदारक स्थिती झालेली आहे. रस्त्यात फूटभर खोल खड्डे पडले आहेत. याच रस्त्यांवरून रेल्वेस्थानक तसेच बसस्थानक, खडका, पंधरा बंगला जाम मोहल्ला, शिवाजीनगर यासह गडकरी नगरसह अनेक परिसरातील सुमारे लाखोंच्या संख्येने नागरिक या रस्त्याने वापर करतात. रस्त्यामुळे अनेक नागरिकांना पाठीचे व्याधी जडले आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे यासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रवी सपकाळे, पप्पू सुरडकर, राहुल बिराडे यांनी एडीआरएम मनोज सिन्हा यांना निवेदन सादर केले व रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी केली.

 

Web Title: Renew Immortal Store to Station Road in Railway Boundary - Statement to the Railway Administration by the Republican Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.