पहूर येथे केवडेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:05+5:302021-08-02T04:07:05+5:30
पहूर, ता. जामनेर : येथील पुरातन केवडेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. तीन दिवस धार्मिक विधी चालणार असून ...
पहूर, ता. जामनेर : येथील पुरातन केवडेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. तीन दिवस धार्मिक विधी चालणार असून दि. २ ऑगस्टपासून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. चौथ्या दिवशी ५ रोजी महाप्रसादाने सांगता होणार आहे.
कशी खंडात येथील केवडेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख असून, जागृत देवस्थान असल्याची आख्यायिका आहे. अति प्राचीन स्वयंभू शिवलिंग याठिकाणी आहे. याचा जीर्णोद्धार केवडेश्वर संस्थानच्या वतीने समस्त गावकरी यांच्या माध्यमातून केला जात आहे. दि. २ ते ४ ऑगस्टपर्यंत धार्मिक विधी चालणार आहे.
५ रोजी महाआरती, महाप्रसादाने सांगता केली जाणार आहे. सोमवारी संपूर्ण गावातून नगर प्रदक्षिणा काढली जाणार आहे. यासाठी गावकरी व केवडेश्वर संस्थानचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.