गिरणा पुलाची थातूरमातूर दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:50 PM2019-11-04T12:50:13+5:302019-11-04T12:50:50+5:30
जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर धोकादायक बनलेल्या गिरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत होती. त्याची दखल घेत ‘नही’तर्फे ...
जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर धोकादायक बनलेल्या गिरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत होती. त्याची दखल घेत ‘नही’तर्फे अखेर या पुलाची डागडुजी रविवारी करण्यात आली. मात्र ही डागडुजी अगदीच थातूर-मातूर असल्याचे दिसून आले.
गिरणा नदीवरील पूल उंच असून त्यावरील काँक्रीट ब्लॉकमध्ये फटी निर्माण झाल्या असून वाहन जाताना पूल हादरत आहे. तसेच पुलावरील रस्त्याचे काँक्रीट उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलावर कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘नही’च्या अधिकाऱ्यांकडे केली. जळगाव ते एरंडोल या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकविताना वाहनांचे अपघात होऊन जिवीत हानी होत आहे. याकडे प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या कामास एक महिन्याच्या आत सुरूवात न झाल्यास शिवसेना ग्राहक कक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या ‘नही’च्या अधिकाऱ्यांनी रविवारी या पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. मात्र हे कामही थातूरमातूर झाल्याचे दिसून आले.