यावल तालुक्यात नागादेवी पाझर तलाव दुरुस्ती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 04:08 PM2020-06-14T16:08:35+5:302020-06-14T16:09:11+5:30
नागादेवी पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला
यावल, जि.जळगाव : नागादेवी पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार लता चंद्रकांत सोनवणे त्यांच्या हस्ते करण्यात आला असून, दुरुस्तीच्या कामास सुरवात झाली आहे. याप्रसंगी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.
सन २००६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नागादेवी पाझर तलाव फुटला होता. त्यानंतर तब्बल १३ वर्षानंतर म्हणजे गेल्या वर्षी जूनमध्ये तो दुरूस्ती करण्यात आला. मात्र संरक्षण भिंतीखाली पाईप राहिल्याने त्यास पुन्हा गळती लागल्याने व पाझर तलाव पुन्हा फुटून परिसरातील जीवित हानी टाळण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर यांंच्या उपस्थितीत पाझर तलावाचे पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले होते. त्यानंतर सततच्या पावसामुळे तलावाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता पुन्हा कामास सुरवात झाली असल्याने या वर्षी पाझर तलावात पाणी साठून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख रवी सोनवणे, गोपाल चौधरी, गोटू सोनवणे, शरद कोळी, संतोष धोबी, राहुल पाटील, योगेश पाटील, दिनू साळुंखे, भाऊसाहेब धनगर, प्रकाश कोळी, सरपंच लीलाधर पाटील, बंटी तडवी व सावखेडा परिसरातील शेतकरी, विकास सोसायटीचे चेअरमन, विविध गावांचे सरपंच व नागरिक उपस्थित होते.