राष्ट्रीय महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करा

By admin | Published: January 21, 2017 12:27 AM2017-01-21T00:27:18+5:302017-01-21T00:27:18+5:30

पालकमंत्र्यांचे निर्देश : भूसंपादनामुळे रेंगाळले चौपदरीकरण; ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ

Repair the National Highway immediately | राष्ट्रीय महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करा

राष्ट्रीय महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करा

Next

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत असून निरपराध नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास प्राधान्य आहे, मात्र भूसंपादनाचा विषय रेंगाळल्याने प्रत्यक्ष काम सुरू करण्यास ऑक्टोबर महिना उजाडेल. ही परिस्थिती लक्षात घेऊन महामार्गावरील खड्डे बुजविणे, साईडपट्टय़ांची दुरूस्ती अशी कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका:यांना दिले असल्याची माहिती  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जिल्हा दौ:यावर आले असता पालकमंत्र्यांनी नूतन मराठा कॉम्प्लेक्समध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून        घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रीय महामार्गाबाबत मुंबईत घेतली तातडीची बैठक
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चेअरमन व अधिका:यांची मुंबईत गुरूवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात राज्यभरातील चौपदरीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

मनपाकडून 100 कोटींची मागणी
महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे व अन्य काही नगरसेवकांनी पालकमंत्र्यांकडे पिंप्राळा उड्डाणपूलाला जोडणारा रस्ता, शिवाजीनगर उड्डाणपूल, जळगाव ममुराबाद रस्ता, जळगाव पाचोरा तसेच धानोरा यासह विविध विकास कामांसाठी 100 कोटींच्या निधीची मागणी करणारे निवेदन दिले. आचारसंहिता संपल्यावर याप्रश्नी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


बदलीची मागणी योग्य-चंदुलाल पटेल
आमदार चंदूलाल पटेल म्हणाले की, अधिका:यांच्या बदलीची मागणी आपल्या समक्ष झाली. ही मागणी योग्य आहे. मात्र या अधिका:यांचा कार्यकाळ येत्या दोन महिन्यात असाही पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांची नैसर्गिक न्याय तत्वानुसार बदली होणारच आहे.
कायद्याचा वचक असावा-सुरेश भोळे
सद्य स्थितीबाबत नागरिकांचा संताप आहे. कायद्याचा वचक असावा. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर उद्रेक होतो. त्यामुळे बदलीची मागणी योग्य आहे.  बदलीची मागणी आपल्या समक्ष झाली असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.


चौपदरीकरणाच्या भूसंपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे.  ‘नॅशनल हायवे’च्या नावाने जागेचा 7/12 उताराही देण्यात आला आहे.   नेमक्या जागेबाबत  ‘नही’च्या अधिका:यांशी चर्चा करू.
- रूबल अग्रवाल, जिल्हाधिकारी.


 

Web Title: Repair the National Highway immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.