रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करा, अन्यथा जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:27+5:302021-01-08T04:50:27+5:30
जळगाव : कोरोना महामारीतून नागरिक सावरत तोवर नादुरस्त रस्त्यांमुळे कमरेसह मणक्याचा व मानेचा त्रास वाढला आहे. जागो-जागी चा-या खोदून ...
जळगाव : कोरोना महामारीतून नागरिक सावरत तोवर नादुरस्त रस्त्यांमुळे कमरेसह मणक्याचा व मानेचा त्रास वाढला आहे. जागो-जागी चा-या खोदून ठेवण्यात आल्या असून त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रोज अपघात घडत आहेत़ त्यामुळे तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आला आहे.
शहरात भुयारी गटारीचे काम सुरू आहे़ यासाठी एल़सी़इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. च्यावतीने जेसीबीच्या सहाय्याने चा-या खोदण्यात आल्या आहेत. त्या चा-या व्यवस्थित बंद करून रस्ता पुर्वरत करणे अनिवार्य आहे. मात्र, या चा-यांची थातूर-मातूर दुरस्ती करण्यात आली असून रोलरच्या सहाय्याने मुरूमही दाबलेले नाही. त्यामुळे रस्ते उंच व सखल झाले आहेत़ वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे देखील मुश्किल झाले असल्याचा आरोप राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचतर्फे करण्यात आला आहे. आता तर चा-यांमध्ये वाहने अडकून अपघात होत आहेत़ त्यात धुळीने जळगावकर हैराण झाले आहे. म्हणून चारीच्या कामांची पाहणी करण्यात यावी व तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी मंचच्यावतीने करण्यात आली आहे. त्वरित रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास जनआंदोलन पुकारण्यात येईल, त्याचबरोबर न्यायालयात दाद मागण्यासाठी दावा दाखल करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.