श्रमदान व लोकवर्गणीतून पाझर तलावांची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:00+5:302021-06-18T04:12:00+5:30
तालुक्यातील कृष्णापूर (नवेगाव) येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या पूर्वेला जंगलातून वाहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह माती बांध पाझर तलावाची ...
तालुक्यातील कृष्णापूर (नवेगाव) येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या पूर्वेला जंगलातून वाहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह माती बांध पाझर तलावाची निर्मिती चार दशकांच्या जवळपास माजी पंचायत समिती सदस्य डॉ. अरुण नथू महाजन यांच्या प्रयत्नांनी मंजुरी मिळाली होती. परंतु त्यास वनविभागाच्या तांत्रिक अडचणीने बांधकामास स्थगिती मिळाली होती. त्याचा पाठपुरावा त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून वनविभागाच्या भोपाळ कार्यालयातून तांत्रिक अडचण दूर करून सचिव दवे यांच्या सहकार्याने पाझर तलावाचे काम पूर्ण होऊन आजपर्यंत त्याचा फायदा परिसरास झाला. परंतु नैसर्गिक कारणाने आजूबाजूला पडझड होऊन त्यातून पाणी वाहून जात होते. पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली असून, अशाच स्वरूपाचे पाझर तलाव कर्जाने पाझर तलाव नं. १ (कर्जाने गाव), पाझर तलाव नं. २ (बोरवाय), पाझर तलाव नं. ३ आंबा पाणी (वराड) अशीच स्थिती या पाझर तलावांची झाली आहे.
या चार बंधाऱ्यांची दुरुस्ती व गाळ काढून घेतल्यास पाण्याचा निचरा जास्त होऊन भूजल पातळीत नक्कीच वाढ होईल म्हणून त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. कृष्णापूर येथील गेमा शंकर बारेला यांच्या प्रेरणेने या कामासाठी शेतकऱ्यांना एकत्रित करून दुरुस्ती व तलावाच्या बांधावर माती भराव श्रमदान व लोकवर्गणीतून सहकार्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी केल्याने यांचा फायदा परिसरात होणार आहे.
याकामी त्यांना भिका भिल्ल, रामदास ढिवरे, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, हिरालाल पाटील, मच्छिंद्र पाटील, कैलास मिस्त्री, सतीश पाटील, अनिल पाटील, राजू कोळी, जयराम कोळी, संजय कोळी, भारत इंगळे मामलदे, बी. जी. महाजन चुंचाळे यांनी सहकार्य केले. या सर्वांचे गेमा शंकर बारेला यांनी आभार मानले.