कल्याणच्या अपघातग्रस्त इंजिनची भुसावळ रेल्वे कारखान्यात दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 06:46 PM2017-04-29T18:46:09+5:302017-04-29T18:46:09+5:30

रेल्वे इंजिनची कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) सुशील चंद्रा यांनी पाहणी केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Repair of welfare accidents in Bhusaval Railway Factory | कल्याणच्या अपघातग्रस्त इंजिनची भुसावळ रेल्वे कारखान्यात दुरुस्ती

कल्याणच्या अपघातग्रस्त इंजिनची भुसावळ रेल्वे कारखान्यात दुरुस्ती

Next

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 29 -मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील पीओएच शेडमध्ये (विद्युत इंजिन कारखाना) दुरुस्तीसाठी आलेल्या कल्याण शेडमधील अपघातग्रस्त डब्ल्यूएजी-9- 31413 या क्रमांकाच्या रेल्वे इंजिनची कमिशनर ऑफ  रेल्वे सेफ्टी (सीआरएस) सुशील चंद्रा यांनी पाहणी   केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. 31413 या  रेल्वे इंजिनला गेल्या वर्षी धनबाद रेल्वे विभागात मोठा अपघात झाला होता. त्यात त्याचे मोठे नुकसान झाले होते.हे इंजिन मुंबई विभागातील कल्याण शेडचे आहे. अपाघातानंतर ते डिसेंबर 2016 मध्ये भुसावळ येथील रेल्वे विद्युत कारखान्यात दुरुस्तीसाठी दाखल झाले.तेव्हापासून त्याची दुरुस्ती सुरू होती. त्याची आज चंद्रा यांनी बारकाईने पाहणी केली.  प्रसंगी भुसावळ विभागाचे डब्ल्यूएजी-5-23568 या इंजिनसह बोगी, ट्रान्सफार्मर आदी विभागांची पाहणी केली. त्यांनी विद्युत इंजिन कारखान्यातील इंजिन दुरुस्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक केले.त्यांच्या सोबत  डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम अरुण धार्मिक, विद्युत इंजिन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जी. सी. पौनिकर, सिनिअर ईडीपीएम भातो, वरिष्ठ विद्युत अभियंता सारीका गर्ग, सहाय्यक कारखाना व्यवस्थापक आर. एम. श्रीवास्तव, रामफल यादव आदी अधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Repair of welfare accidents in Bhusaval Railway Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.