चांदसर येथे टळली राईनपाड्याची पुनरावृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:45 AM2018-07-12T01:45:29+5:302018-07-12T01:45:39+5:30
सरपंचांचा संयम : दोन महिला ताब्यात
धरणगाव/पथराड, जि.जळगाव : धरणगाव येथून जवळ असलेल्या चांदसर येथे ११ रोजी सकाळी अकराच्या सुमारास गावात मुले पळविणाऱ्या दोन महिला आल्याची वार्ता गावात वाºयासारखी पसरली. गावात शोधाशोध सुरु झाली. गावातील जमावाने त्या महिलांचा शोध घेतला व त्यांना धरुन ग्रामपंचायत कार्यालयात आणले. यावेळी सरपंच सचिन पवार यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करुन तत्काळ पोलिसांना पाचारण केले व पोलिसांनी त्या दोघा महिलांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असता, त्या महिला मध्य प्रदेशातील असून, त्या पाळधी रेल्वे गेटजवळ झोपडीत वास्तव्यास असल्याचे व भंगार वेचून उदरनिर्वाह करीत असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत चांदसर ग्रामस्थांचा संयम सुटला असता तर या ठिकाणी राईनपाड्याची पुनरावृत्ती झाली असती, अशी चर्चा होती.
चांदसर ग्रामस्थांचे गाºहाणे ऐकून घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या महिलांना पाळधी दूरक्षेत्र व धरणगाव पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले. या वेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि नीलिमा बिºहाडे यांनी चौकशी केली असता त्या दोघा महिला भीलखेडी, ता.कामठा, जि.खंडवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, त्यांनी आपले बिºहाड पाळधी येथील रेल्वेगेटजवळ थाटले आहे. परिसरात भंगार वेचून आपण आपला उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती या महिलांनी दिली.
त्यांचे आधारकार्ड तपासल्यानंतर या दोघा महिलांविरुद्ध १०९ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली व त्यांना सोडण्यात आले. चांदसर ग्रामस्थांनी संयमाने कायद्याचा आधार घेऊन पोलिसांच्या ताब्यात महिलांना दिल्याबद्दल सरपंच सचिन पवार यांनी आभार मानले आहे, तर अशा अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता अज्ञात लोकांविषयी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.