रस्त्यांबाबत अहवाल द्या
By admin | Published: April 11, 2017 12:54 AM2017-04-11T00:54:52+5:302017-04-11T00:54:52+5:30
मुख्यमंत्र्यांकडून दखल : मनपाकडून आठवडा उलटूनही दखल नाही
जळगाव : शहरात सतत होणा:या अपघातांवर उपाय योजना करण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते, समांतर रस्ते व उड्डाणपूल विकासाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल नगरविकास विभागाने स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तत्काळ मागविला आहे. हे पत्र 30 मार्च रोजी प्राप्त होऊनही मनपाने अद्याप त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविलेला नाही.
शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग क्र.6वर सातत्याने होत असलेल्या अपघातांमध्ये निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने समांतर रस्त्यांचा तातडीने विकास करणे, तसेच शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल करून बाह्य वळण रस्त्याचे कामही तातडीने करण्याची मागणी होत आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जळगाव फस्र्टच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनही करण्यात आले. जाहीर सभाही घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिका:यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची बैठक घेऊन समांतर रस्ते, शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल यासाठी सुमारे 350 कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात येऊन ता े मंजुरीसाठी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 23 जानेवारी रोजीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या समस्या सोडविण्यासाठी विकास कामांना गती देणे आवश्यक असून त्यादृष्टीने या निवेदनाचा विचार व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास विभागाच्या कक्ष अधिका:यांनी 27 मार्च रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या समस्यांच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागविला आहे.
जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शहरात सातत्याने होत असलेल्या अपघातांवर उपाय होण्यासाठी शहरातून जाणा:या महामार्गाला समांतर रस्ते व्हावेत, तसेच 100 वर्ष जुना शिवाजीनगर, पिंप्राळा, सुरत रेल्वे गेट, असोदा रेल्वे गेट, कालिंका माता चौक ते अजिंठा चौक, ईच्छादेवी ते आकाशवाणी चौक, तसेच पॉलिटेकAीक कॉलेजजवळ उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती. याखेरीज शहरातील औद्योगिक क्षेत्र वाढवून नवीन औद्योगिक प्लॉटस् उपलब्ध करून देणे, महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प कार्यालय जळगावात व्हावे, जळगाव-चोपडा-शिरपूर, ममुराबाद-यावल-शिरपूर व एरंडोल-म्हसावद-नेरी हे रस्ते चौपदरी करण्याची मागणी केली होती.