जळगावात अपंग युनिटप्रकरणी शासनाकडे अहवाल रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:17 PM2018-03-07T13:17:34+5:302018-03-07T13:17:34+5:30
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ७ - जि.प.मधील अपंग युनिट प्रकरणी जि.प. शिक्षण विभागाने आपला अहवाल शासनाकडे पाठविला आहे. दरम्यान, या युनिटप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी जि.प. कडे मागितलेले सात मुद्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. दिवेकर यांना माहिती नसून याबाबत आपण उद्या माहिती घेऊ, असे त्यांनी सांगितले.
जि.प.च्या अपंग युनिट प्रकरणामध्ये राज्यातील एकूण ५९४ युनिटपैकी तब्बल २७४ युनिट म्हणजेच निम्म्याहून अधिक युनिट एकट्या जळगाव जिल्ह्यात आहेत. यातील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाल्याने हे प्रकरण व बनवेगिरीही समोर आली. या बाबत जि.प.ने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अपंग युनिटचा अहवालही मागविला.
या दरम्यान तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली झाली. आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. दिवेकर यांना पोलिसांना द्यावयाच्या अहवालाबाबत विचारले असता, ते म्हणाले या बाबत मला कल्पना नाही. उद्या माहिती घेतो.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे. पाटील यांना विचारले असता, अहवाल शासनाकडे पाठविला आहे. पोलिसांना द्यावयाच्या अहवालाबाबत वरिष्ठ माहिती देऊ शकतात, असेही ते म्हणाले.