जळगाव जिल्ह्यात धान्य गोदाम तपासणी, पथकाकडून जिल्हाधिका-यांना अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 01:09 PM2018-01-27T13:09:12+5:302018-01-27T13:10:30+5:30

चोपडा, यावल,जामनेर तालुक्यात तपासणीसाठी दुसरे पथक  येणार

Report of the grain warehouse from the squadrs to the district collector | जळगाव जिल्ह्यात धान्य गोदाम तपासणी, पथकाकडून जिल्हाधिका-यांना अहवाल सादर

जळगाव जिल्ह्यात धान्य गोदाम तपासणी, पथकाकडून जिल्हाधिका-यांना अहवाल सादर

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  जिल्ह्यातील रेशनच्या गोदाम तपासणीचा अहवाल गुरुवारी मुंबईच्या पथकाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना सादर केला. जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांच्या तपासणीसाठी दुसरे एक पथक जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनीअन्न नागरी पुरवठा मंत्री  गिरीश बापट यांच्याकडे तक्रारही केली होती.  या तक्रारीनुसार मुंबई येथील 12 जणांचे पथक जिल्ह्यात आले आहे. या  पथकाने जिल्ह्यातील गोदामांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान काही गोदामातील दप्तरही ताब्यात घेण्यात आले.  आता चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांची तपासणी दुस-या  पथकाकडून केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील गोदामांच्या तपासणीबाबतचा अहवाल गुरुवारी पथकाने सादर केला. त्याचा अभ्यास करून पुढील कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल. 
-किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी

Web Title: Report of the grain warehouse from the squadrs to the district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.